आयपीएल 2021ला सुरूवात होण्यासाठी फक्त काही दिवस शिल्लक राहिले असून या संदर्भात बीसीसीआयने आपली सर्व तयारी पूर्ण केली आहे. मार्च महिन्याच्या सुरूवातीला जाहीर झालेल्या अधिकृत वेळापत्रकानुसार 9 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांमध्ये आयपीएलच्या 14 व्या सत्राचा पहिला सामना होणार आहे.
या हंगामातील कर्णधारांबद्दल जर आपण विचार केला तर काही संघांकडे खूप चांगले आणि जागतिक दर्जाचे कर्णधार आहेत. परंतु, काही संघांना या विषयावर विचार करणे आवश्यक आहे. तर आज आपण आयपीएल 2021 सुरू होण्यापूर्वी कर्णधार बदलण्याची आवश्यकता असलेल्या दोन संघांबद्दल चर्चा करणार आहोत.
1. पंजाब किंग्ज
पंजाब किंग्ज संघाचा सध्याचा कर्णधार हा केएल राहुल आहे. मागील सत्रात 2020 मध्ये पंजाब संघाने त्याच्या नेतृत्वात अधिक चांगली कामगिरी केली नव्हती. तसेच आयपीएल 2021 च्या अगदी काही काळ अगोदर राहुलला फलंदाजीचा सूर गवसला आहे. ज्यामुळे त्याला त्यांच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करणे फार महत्वाचे आहे.
त्यामुळे पंजाब किंग्ज व्यवस्थापनाने कर्णधारपदा संदर्भात विचार केला पाहिजे. केएल राहुलला या कर्णधार पदाच्या जबाबदारीपासून मुक्त करून फलंदाज म्हणून त्याच्याकडून आणखी चांगली कामगिरी करवून घेतली जाऊ शकते. त्याच्या जागी 41 वर्षीय ज्येष्ठ फलंदाज आणि वेस्ट इंडिज संघाचा माजी कर्णधार ख्रिस गेल हा पंजाब संघाचा कर्णधार म्हणून चांगला पर्याय आहे.
2. कोलकाता नाईट रायडर्स
गेल्या वर्षी दुबईत खेळल्या गेलेल्या आयपीएल 2020 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाने सुरुवातीला तामिळनाडूच्या 35 वर्षीय ज्येष्ठ यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकला आपला कर्णधार म्हणून नेमले होते. पण त्यांनी या हंगामाच्या मध्येच इंग्लंड संघाचा कर्णधार ओएन मॉर्गन याच्याकडे संघाची कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली होती.
परंतु, आपण आयपीएल 2021 बद्दल बोललो तर या आयपीएल मोसमामध्ये न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यामध्ये एक मालिका होणार आहे. त्यामुळे मॉर्गनला आयपीएलमधून मध्येच जावे लागू शकते. त्यामुळे पुढील गोष्टी लक्षात घेऊन या संपूर्ण हंगामात संघाची कमान सांभाळू शकणाऱ्या खेळाडूला केकेआरने कर्णधारपदाची जबाबदारी द्यायला हवी.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2021: ‘या’ कारणांमुळे मुंबई इंडियन्स सलग तिसऱ्यांदा आयपीएल विजेता होण्यात ठरु शकतो अपयशी
IPL 2021: एबी डिव्हिलियर्स पाठोपाठ ‘कॅप्टन’ कोहली चेन्नईत दाखल, पाहा फोटो