चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आणि भारताचा माजी दिग्गज खेळाडू महेंद्रसिंग धोनी(MS Dhoni) हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता चियान विक्रम(chiyyan vikram) याला भेटला आहे. त्या दोघाचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आयपीएलचा मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारीला पार पडणार आहे. त्याच्याअगोदरच धोनी चियान विक्रमला भेटला आहे. ‘थाला’ आणि विक्रमचा हा फोटो चाहत्यांना खूपच आवडला आहे. त्यामुळे चाहते तो फोटो चांगलाच शेअर करत आहेत.
धोनी आणि अपरिचित चित्रपट फेम विक्रम हे दोघे सुद्धा दक्षिण भारतात खूप लोकप्रिय आहेत आणि सर्वात जास्त ते चेन्नईमध्ये लोकप्रिय असून तेथे त्यांच्या चाहत्यांची संख्या सुद्धा खूप आहे. चेन्नई सुपर किंग्ज फॅन्स क्लबच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. याफोटोमध्ये अभिनेता चियान विक्रम आणि एमएस धोनी एकत्र उभे दिसत आहेत. तसेच चेन्नई सुपर किंग्जच्या टीमनेही धोनीचा हा फोटो शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/CZdtzn8rYN-/?utm_source=ig_web_copy_link
https://www.instagram.com/p/CZZQ9Nmv4j6/?utm_source=ig_web_copy_link
तमिळ चित्रपटांचा सुपरस्टार चियान विक्रमने बॉलिवूड चित्रपटांमध्ये सुद्धा अभिनय केला आहे. विक्रम नेहमीच धोनीचा चाहता आहे. विक्रमचा ‘महान’ या चित्रपट टीझर रिलीजच्या वेळी तो धोनीला भेटला आहे. धोनी सध्या चेन्नईत आयपीएल 2022 मेगा लिलावाची तयारी करत आहे.
आयपीएल २०२२ साठी मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बँगलोर येथे होणार आहे. या लिलावासाठी अनेक खेळाडू सहभागी झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्जने २०२२ च्या मोसमासाठी धोनी, रवींद्र जडेजा आणि ऋतुराज गायकवाड यांना संघात रिटेन केले आहे. लिलावात चेन्नई संघाजवळ ४८ कोटी रुपये आहेत. आता सर्वांच्या नजरा आयपीएल 2022 च्या आयपीएल लिलावाकडे लागल्या आहेत.
कॅप्टनकूल महेंद्र सिंग धोनी आयपीएल २०२२ मध्ये शेवटचा सीझन खेळेल अशी अपेक्षा आहे. आयपीएल २०२१ जिंकल्यानंतर धोनीने म्हटले होते की, त्याचे शेवटचे आयपीएल चेन्नईमध्ये फक्त देशांतर्गत चाहत्यांमध्ये होईल. धोनीचे वय आणि गेल्या आयपीएलमधील त्याची कामगिरी लक्षात घेऊन धोनी २०२२ मध्ये शेवटची आयपीएल खेळू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मेगा लिलावातून नाव मागे घेतल्यानंतर आर्चरचा यू टर्न, ‘या’ कारणामुळे बीसीसीआयने केलंय शॉर्टलिस्ट
‘पुणेरी पलटण’ने ‘यू मुंबा’ना दिली शिकस्त, अवघ्या २ गुणांच्या फरकाने सामन्यात मारली बाजी