---Advertisement---

IPL 2022: कोहलीची आक्रमकता, धोनीचा शांत स्वभाव आणि रोहितचा ‘हा’ गुण घेत हार्दिक सुरू करणार ‘नवी इनिंग’

On: बुधवार, फेब्रुवारी 2, 2022 10:40 PM
hardik mi
---Advertisement---

भारतीय संघाचा दिग्गज अष्टपैलू हार्दिक पांड्या (hardik pandya) आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये एक नवीन सुरुवात करणार आहे. आतापर्यंत तो एका खेळाडूच्या रूपात आयपीएलमध्ये खेळत होता, पुढच्या हंगामात तो अहमदाबाद संघाच्या कर्णधाराची भूमिका पार पाडणार आहे. आयपीएलमध्ये नव्याने सामील होणाऱ्या अहमदाबाद संघाने मेगा लिलावापूर्वी हार्दिक पांड्या, राशिद खान आणि शुभमन गिल यांना संघात रिटेन केले आहे. अशात आता हार्दिकने संघाच्या कर्णधारपदाविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

यापूर्वी हार्दिक रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्ससाठी खेळत आला आहे. यावर्षी पहिल्यांदाच तो एका आयपीएल संघाचे नेतृत्व करणार आहे. यासंदर्भात क्रिकबजशी बोलताना हार्दिक म्हणाला की, “कर्णधार बनण्याची पद्धत शिकण्यासाठी कोणता दुसरा मार्ग नाहीय. मी नेहमीच एक असा व्यक्ती राहिलो आहे, ज्याला जबाबदारी घ्यायला आवडते आणि त्या आव्हानाची वाट पाहत आहे. एका कर्णधाराच्या रूपात मला हे सुनिश्चित करायचे आहे की, सर्व खेळाडूंना माझ्याकडून पुरेसा वेळ दिला जाईल. मी हेच शिकलो आहे आणि इच्छा आहे की, माझे दरवाजे त्यांच्यासाठी नेहमी उघडे असतील.”

धोनी, विराट आणि रोहितकडून हार्दिक पांड्या घेणार ‘हे’ गुण
हार्दिक पांड्या आयपीएल आणि भारतीय संघासाठी यापूर्वी एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या नेतृत्वात खेळला आहे. भारताच्या या तीन दिग्गज कर्णधारांमधील कोणते गुण त्याला घ्यायला आवडतील? या प्रश्नावर उत्तर देताना हार्दिक म्हणाला की, “विराटकडून मी त्याची आक्रमकता, उत्साह आणि ऊर्जा घेईल, जी जबरदस्त आहे. महेंद्रसिंग धोनीकडून मी शांत स्वभाव घेईल आणि रोहित शर्माकडून खेळाडूंना ठरवू द्यायचे की त्यांना काय करायचे आहे, ही गोष्ट घेईल. हे तीन गुण मी त्यांच्याकडून घेईल आणि त्यांना याठिकाणी उतरवील.”

सपोर्ट स्टाफविषयी हार्दिकचे मत
अहमदाबादच्या सपोर्ट स्टाफमध्ये मोठ्या नावांना सामील केले गेले आहे. मुख्य प्रशिक्षकपदी आशीष नेहराला निवडले गेले आहे, तर गॅरी कर्स्टन संघाचे मेंटॉर आहेत. या दिग्गजांच्या मार्गदर्शनात अहमदाबाद फ्रेंचायझी चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. हार्दिक यासंदर्भात बोलताना म्हणाला की, “आम्ही एक नवीन सुरुवात करत आहोत आणि मला वाटते की, नवीन संस्कृती आणि वारसा तयार करत आहोत, ज्याचे मी समर्थन करू इच्छितो. ही खूपच रोमांचक वेळ असेल.”

महत्वच्या बातम्या –

‘पटणा पायरेट्स’चा पुन्हा दरारा, ‘यूपी योद्धां’ना ३७-३५ने धूळ चारत नोंदवला नववा विजय

जिथे आयुष्याला डाग लागला, तिथेच तो डाग मिटवायला येतोय परत!! लिलावातील संधीवरून श्रीसंत भावुक

यष्टीरक्षकांच्या शोधात आहेत फ्रँचायझी, ईशान किशनसह ‘या’ विकेटकिपर्सची लिलावात होणार चांदी!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---