आयपीएल २०२२ (IPL 2022) पूर्वी बीसीसीआयने १२ आणि १३ फेब्रुवारीला मेगा लिलाव आयोजित केल आहे. मेगा लिलिवासाठी १२१४ खेळाडूंनी स्वतःची नावे नोंदवली होती, पण बीसीसीआयने त्यपैकी ५९० खेळाडूंची अंतिम यादी मंगळवारी (१ फेब्रुवारी) जाहीर केली. हे ५९० खेळाडू लिलावात प्रत्यक्ष सहभाग घेतील. या यादीत एक नाव असे होते, जे पाहून प्रत्येक जण हैराण झाला. हे नाव म्हणजे इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (jofra archer).
आर्चरने मेगा लिलावासाठी स्वतःचे नाव नोंदवले नव्हते. १२१४ खेळाडूंच्या यादीतही त्याचे नाव नव्हते. पण आता मात्र त्याचा विचार बदलल्याचे दिसत आहे. आता आर्चरचे नाव लिलावात सहभागी होणाऱ्यांमध्ये असल्यामुळे चाहते हैराण झाले आहेत. बीसीसीआयने या संपूर्ण प्रकारणाविषयी माहिती दिली आहे. बीसीसीआयने फ्रेंचायझींना सांगितले आहे की, आर्चर यावर्षी आयपीएलमध्ये खेळेल याची खूप कमी शक्यता आहे. पण इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डने सांगितले आहे की, आर्चर २०२३ आणि २०२४ हंगामात खेळेल. याच कारणास्तव त्याचे नाव मेगा लिलावात सामील केले गेले आहे.






