कुठलाही खेळ असो त्या खेळात खेळाडूला दुखापत होणार नाही असे फार क्वचितच होते. कारण, खेळ म्हटले की दुखापत तर होणारच. मात्र दुखापतींचा सामना करूनही काही खेळाडू नाव कमवतात, तर काहींची कारकिर्द दुखापतींना भेट चढते. हल्लीच ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज बेन डंक जखमी झाला आहे. सरावादरम्यान बेन डंकला खूप मोठी दुखापत झाली आहे. पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) २०२१ च्या उर्वरित सामन्यांसाठी सराव करताना बेन डंकसोबत ही दुर्दैवी घटना घडली आहे.
त्याचे झाले असे की, अबू धाबी स्टेडियममध्ये झेलचा सराव करतेवेळी बेन डंकच्या तोंडावर चेंडू आदळला. यावेळी त्याच्या ओठांवर गंभीर जखम झाली. त्यामुळे त्याला सर्जरी करावी लागली आणि त्यामध्ये त्याच्या ओठांवर ७ टाके पडले.
बेन डंक प्रतिनिधित्त्व करत असलेल्या लाहोर कलंदर्स संघाचे सीईओ समीन राणाने सांगितले की, “बेन डंकची परिस्थिती सध्या सुधारत आहे. येत्या ९ जूनला इस्लामाबाद युनायटेड संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात बेन डंक उपस्थित असेल.”
येत्या ९ जूनपासून पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) २०२१ च्या राहिलेल्या सामन्यांना सुरुवात होईल. पाकिस्तान सुपर लीग सुरुवात तीन महिन्यांपूर्वी लाहोर येथे सुरु झाली होती. परंतु, कोरोना संक्रमनामुळे अर्ध्यात ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) स्पष्टीकरण दिले की, येत्या ९ जूनपासून उर्वरित सामने खेळवले जातील आणि सुरुवातीचा सामना लाहोर कलंदर्स विरुद्ध इस्लामाबाद युनायटेड असेल.
इंग्लंड दौऱ्यापूर्वीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डला सगळे सामने संपवायचे आहेत. त्यामुळे त्यांना ६ डबल हेडर (एका दिवशी दोन सामने) खेळणे गरजेचे आहे. दरम्यान, साखळी सामने आणि तसेच नॉकआउट सामने खेळवले जातील. २४ जूनला अंतिम सामना खेळून पाकिस्तान संघ २५ जूनला मॅनचेस्टर, इंग्लंडला रवाना होईल.
बेन डंकने २०१४ साली ऑस्ट्रेलिया संघात पदार्पण केले होते. त्यानंतर खूप कालावधीने २०१७ला ऑस्ट्रेलिया संघासाठी खेळला. बेन डंकने ऑस्ट्रेलियासाठी फक्त ५ टी-२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने १९.८च्या सरासरीने केवळ ९९ धावा केल्या आहेक. बेन डंक सध्या ऑस्ट्रेलिया क्रिकेटचा भाग नाही. बेन डंक आता फक्त लीग क्रिकेट खेळताना दिसून येतो.
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेट क्षेत्रातील ‘बच्चन’! ‘हे’ आहेत सर्वात उंच क्रिकेटपटू, अव्वलस्थानचा खेळाडू ७ फूट ४ इंच
पुन्हा रंगणार आयपीएल २०२१चा थरार! उर्वरित हंगामाला ‘या’ दिवशी युएईमध्ये होणार सुरुवात
रोहितच्या भिडूने ८ वर्षांच्या वयात पाहिले होते ‘हे’ मोठे स्वप्न, दुर्दैवाने जवळ पोहोचूनही राहिला दूर