न्यूझीलंडविरुद्ध येत्या १७ नोव्हेंबरपासून ३ सामन्यांची टी२० मालिका भारतीय संघाला मायदेशात खेळायची आहे. या मालिकेसाठी भारतीय टी२० संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्माची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय टी२० संघाचे कर्णधारपद सोडलेल्या कोहलीला १७ नोव्हेंबरपासून जयपूर येथे सुरू होणाऱ्या टी२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. रोहितच्या नावाची टी-२० कर्णधारपदाची घोषणा होताच ट्विटर चाहत्यांनी ट्विट्सचा पाऊस पाडला. भारतीय क्रिकेटमध्ये नवीन अध्यायाला सुरुवात होत असल्याचे देखील काहींनी म्हटले आहे.
निवड समितीने रोहित शर्माला टी२० संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर क्रिकेट चाहत्यांनी ट्विटरवर रोहितच्या नावाने ट्रेंड सुरू केले. विराट कोहलीच्या जागी रोहित शर्मा हा योग्य पर्याय असेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता, मात्र अधिकृत घोषणेची अद्याप प्रतीक्षा होती. आता ती प्रतिक्षा पूर्ण झाली असून रोहितच्या नावावर नवा भारतीय टी२० कर्णधार म्हणून शिक्कामोर्तब झाले आहे.
टी२० कर्णधारपदासाठी रोहितच्या नावाची घोषणा झाल्यानंतर एका चाहत्याने लिहिले की, ‘मला खूप आनंद होत आहे. रोहित भारतीय संघाला योग्य दिशा देईल.’ अजून एका चाहत्याने लिहिले की, ‘भारतीय क्रिकेटमध्ये नवीन अध्यायाची सुरुवात होत आहे.’ रोहितची निवड झाल्यानंतर लाईक्स कमेंट्सचा पाऊस पडला आहे.
New Era began #captain #Hitman pic.twitter.com/k9LvfephVg
— SUBBU (@SUBBU0809) November 9, 2021
So happy with @ImRo45 getting the captaincy of india. A great captain, Hope we win the next wc. #RohitSharma
— Shreyash🐐 (@Shreyash_2204) November 9, 2021
My dream has come to see Rohit as Indian Captain. Already kept some wine 🍷 for celebration tonight.
Remember the tag and put last time #Rohitasindiancaptain
I am so much happy for#RohitSharma pic.twitter.com/B9tuoQkfQY
— 𝐉.𝐈.𝐓.🚩 😷 (@JitRo45) November 9, 2021
Skipper #RohitSharma ❤️
That's what we wanted🥺❤️
#Hitman pic.twitter.com/GeTS5aYsSA— मुस्कान सिंह (@Muskan_shrinet) November 9, 2021
Hail to the King #RohitSharma #TheCaptain pic.twitter.com/5WKkj6A4lA
— 🤩 (@Aetiology_) November 9, 2021
Waiting to see #RohitSharma 's magic..
We have full faith in #Hitman ,,Definitely he will make us proud like #MSDhoni sir..#INDvsNZ #TeamIndia— NameIsSatya…@ (@AlwaysSevennnn) November 9, 2021
https://twitter.com/KalotaGolu/status/1458122963224391680
Finally Rohit Sharma became team India captain. ❤❤
Congrats @ImRo45#RohitSharma #Hitman #INDvNZ pic.twitter.com/0oAbLW9P03
— HITMAN ROCKY 😎 (@HITMANROCKY45_) November 9, 2021
Congratulations @ImRo45 on becoming the captain of the Indian Cricket team❤❤#RohitSharma #Hitman #INDvNZ
— Aditi (@aditi7506) November 9, 2021
Finally the wait is over💥 Thank You @bcci new Indian team Captain @ImRo45 ❤ #hitman #TeamIndia
— Lazyelegant (@lazyelegant) November 9, 2021
न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय टी२० संघात इंडियन प्रीमियर लीग २०२१ मध्ये सर्वाधिक धावा करणारा ऋतुराज गायकवाड आणि हर्षल पटेल यांचाही भारताच्या १६ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. दुखापतग्रस्त हार्दिक पंड्याचा संभाव्य बदली म्हणून पाहिल्या जाणाऱ्या अष्टपैलू व्यंकटेश अय्यरलाही संघात स्थान मिळाले आहे.
टी२० विश्वचषकात प्रभाव पाडण्यात अपयशी ठरल्याने हार्दिक पंड्याला संघातून वगळण्यात आले आहे. ऋतुराजने श्रीलंका मालिकेदरम्यान भारताकडून पदार्पण केले आहे. वरिष्ठ लेगस्पिनर युझवेंद्र चहल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांचे संघात पुनरागमन झाले आहे.
श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि दीपक चाहर या टी२० विश्वचषकातील राखीव खेळाडूंचाही संघात समावेश करण्यात आला आहे. रोहितची नियुक्ती ही केवळ औपचारिकता होती, तर केएल राहुल उपकर्णधार असेल. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांनाही या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे.
भारताचा टी२० संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.
महत्त्वाच्या बातम्या –
रहाणेला डावलून रोहितला मिळणार न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत नेतृत्वाची संधी? वाचा सविस्तर
भारत-न्यूझीलंड सामना स्टेडियममध्ये जाऊन पाहायचा असेल, तर पाळावे लागतील ‘हे’ कठोर नियम
टी२० विश्वचषकादरम्यान कर्णधार विराटने घेतलेले ‘हे’ ३ निर्णय भारतीय संघासाठी पडले महागात