---Advertisement---

4,4,4,4,4,4….मेगा लिलावात अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूने ओव्हरमध्ये ठोकले सलग 6 चौकार!

Ben Duckett
---Advertisement---

सध्या ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीगचे सामने सुरू आहेत. या स्पर्धेत अनेक खेळाडू आपल्या नावाचा डंका वाजवत आहेत. नुकतेच इंग्लंडच्या बेन डकेटनं येथे धमाकेदार कामगिरी केली. सिडनी सिक्सर्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्यानं तुफानी खेळी करत आपल्या संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेलं. या सामन्यात डकेटनं अकिल हुसैनच्या एका ओव्हरमध्ये चक्क 6 चौकार मारले!

बिग बॅश लीगचा 11 वा सामना सिडनी सिक्सर्स आणि मेलबर्न स्टार्स यांच्यात सिडनीमध्ये खेळला गेला. या सामन्यात मेलबर्न स्टार्स संघानं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 9 गडी गमावून 194 धावा केल्या. मात्र, प्रत्युत्तरात सिडनी सिक्सर्सनं हे लक्ष्य 18.1 षटकांत केवळ 2 गडी गमावून गाठलं. जेम्स विन्सनं सिडनीसाठी स्फोटक शतक झळकावून संघाला जबरदस्त विजय मिळवून दिला. त्यानं केवळ 58 चेंडूत 12 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनं नाबाद 101 धावा केल्या.

तत्पूर्वी, हा सामना गाजवला तो इंग्लंडचा स्फोटक फलंदाज बेन डकेट यानं. त्यानं मेलबर्न स्टार्सकडून फलंदाजी करताना अवघ्या 29 चेंडूंत 10 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 68 धावा केल्या. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात डकेटनं अकिल हुसेनविरुद्ध एकाच षटकात 6 चौकार मारले. या 6 चौकारांच्या मदतीनं त्यानं एकूण 24 धावा केल्या. बेन डकेटच्या या धमाकेदार फलंदाजीचा व्हिडिओ तुम्ही येथे पाहू शकता.

 

बेन डकेटनं आयपीएल 2025 च्या लिलावासाठी आपलं नाव नोंदवलं होतं. परंतु आश्चर्याचं म्हणजे, लिलावादरम्यान कोणीही त्याच्यावर बोली लावली नाही. अशाप्रकारे लिलावादरम्यान तो अनसोल्ड गेला. आता बिग बॅश लीगमध्ये जबरदस्त इनिंग खेळून डकेटनं दाखवून दिलंय की त्याच्यात टी20 क्रिकेट खेळण्याची क्षमता आहे. लिलावात अनसोल्ड राहिला असला तरी डकेट आयपीएल 2025 मधून पूर्णपणे बाहेर झालेला नाही. भविष्यात तो बदली खेळाडू म्हणून एखाद्या संघाचा भाग बनू शकतो.

हेही वाचा – 

भारत-ऑस्ट्रेलिया बॉक्सिंग डे कसोटी पाहण्यासाठी किती चाहते आले? संख्या जाणून विश्वासच बसणार नाही!
स्टीव्ह स्मिथची ब्रॅडमन-पाँटिंगच्या धडाकेबाज लिस्टमध्ये एंट्री, अशी कामगिरी करणारा केवळ चौथाच फलंदाज
कॉन्स्टासला धक्का मारल्यानंतरही विराट कोहलीवर एका सामन्याची बंदी का लावली नाही? नियम जाणून घ्या

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---