इंग्लंडच्या क्रिकेट संघासाठी आगामी काही महिने अतिशय महत्त्वाचे आहेत. आगामी काळात इंग्लंड संघ न्यूझीलंडविरुद्ध 2 तर भारताविरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र या महत्वाच्या मालिकांपूर्वी इंग्लंड संघाला दुखापतींचे ग्रहण लागले आहे. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर मागेच जखमी झाला आहे. व आता बातमी समोर येत आहे की त्यांचा यष्टिरक्षक फलंदाज बेन फोक्स दुखापत ग्रस्त झाला असून तो न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.
बेन फोक्सचा डाव्या हेमस्ट्रिंगला दुखापत झाली असल्याचे वृत्त समोर येत आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. फोक्स जवळजवळ पुढील तीन आठवडे मैदानावर खेळू शकत नसल्याचे समजते आहे. फोक्सच्या जागी आक्रमक युवा खेळाडू सॅम बिलिंग्जचा संघात समावेश करण्यात आला आहे.
रविवारी ओव्हल येथे मिडलसेक्स विरुद्ध सरे यांच्यातील काउंटी चॅम्पियनशिप मधील सामना संपल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये फिरत असताना फोक्स जखमी झाला. सरे मेडिकल टीमद्वारे त्याचे मूल्यांकन केले जाणार असून, त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल. फोक्स आगामी न्युझीलंड विरुद्धच्या मालिकेत संघाचा प्रमुख यष्टिरक्षक होता. विशेष म्हणजे फोक्सचा हा इंग्लंड मधील पहिलाच कसोटी सामना होता. यापूर्वीचे आठही कसोटी सामने त्याने इंग्लंड बाहेर खेळलेले आहेत. फोक्सने फलंदाजी व यष्टीरक्षण या दोन्ही बाबतीत सर्वांनाच प्रभावित केले होते.
फोक्सने मार्च मध्ये भारताविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात शानदार यष्टिरक्षण केले होते. त्याच्या या शानदार कामगिरीमुळे संपूर्ण क्रिकेट विश्वाकडून त्याचे कौतुक केले जात होते.आगामी काळात भारता विरुद्धची मालिका व वर्षाच्या शेवटी ॲशेस मालिका होणार असल्यामुळे, इंग्लंड संघाच्या समर्थकांना आशा असेल की, फोक्सची ही दुखापत जास्त गंभीर नसावी व त्याने लवकरच मैदानावर पुनरागमन करावे.
महत्त्वाच्या बातम्या –
विश्वचषक २०२३ मध्ये कोण असेल भारतीय संघाचा फिनिशर? या खेळाडूंचा आहे पर्याय
इंग्लंड दौऱ्यावर यशस्वी होण्यासाठी विश्वविजेत्या कर्णधाराने रिषभ पंतला दिला हा कानमंत्र
टी२० वर्ल्डकपपूर्वी इंग्लंडच्या खेळाडूची निवृत्ती, केल्या आहेत बारा हजारपेक्षा जास्त धावा