बिग बॅश लीग २०२१-२२ (Big Bash League 2021-22) चा २२वा सामना होबार्ट हरिकेन्स (Hobart Hurricanes) आणि एडलेड स्ट्रायकर्स (Adelaide Strikers) मध्ये रंगला. होबार्टमधे खेळवला गेलेल्या या सामन्यात यजमान होबार्ट हरिकेन्सचा बेन मॅकडरमॉटच्या (Ben McDermott) शतकीय खेळीमुळे दणदणीत विजय झाला. २७ वर्षीय बेनने आपलं बीबीएलमधील दुसरे शतक साजरे केले. एडलेड स्ट्रायकर्सने प्रथम फलंदाजी करताना १७५ धावा केल्या. मॅकडरमॉटने फक्त ६० चेंडूत १२ चौकार आणि ५ षटकारांसह ११०* खेळी करत संघाला ९ चेंडू राखत विजय मिळवून दिला.
That magic moment 💯
Ben McDermott brings up his second Big Bash century in STYLE 😎 #BBL11 pic.twitter.com/XsZP6cwY8y
— KFC Big Bash League (@BBL) December 27, 2021
मॅकडरमॉटने १२ चौकार आणि ५ षटकार मारले तसेच त्याचा स्ट्राईक रेट सुध्दा १८० पेक्षा जास्त होता. ७८ धावा तर त्याच्या चौकार-षटकारामधूनच आल्या. मॅकडरमॉटने आतापर्यंत बीबीएलमध्ये (BBL) ६२ सामन्यांत ३६.४९ च्या सरासरीने १७८८ धावा केल्या आहेत. त्याने ८ अर्धशतके केली आहेत. ऑस्ट्रेलियाकडून खेळताना २ एकदिवसीय सामन्यात २८ धावा आणि १५ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात १३.६६ च्या सरासरीने १६४ धावा केल्या आहेत.
A masterclass from Ben McDermott tonight as he belted 12 fours and five sixes to steer the Hurricanes to victory over the Strikers! #BBL11
— cricket.com.au (@cricketcomau) December 27, 2021
कोण आहे बेन मॅकडरमॉट
बेन मॅकडरमॉटचे वडील क्रेग मॅकडरमॉट (Craig McDermott) एक जलद गोलंदाज होते. क्रेग यांनी त्यांच्या कारकिर्दीत ७१ कसोटी सामने आणि १३८ एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटीत २९१ तर एकदिवसीय सामन्यात २०३ विकेट्स घेतल्या आहेत. क्रेग मॅकडरमॉट यांनी १७४ प्रथमश्रेणी सामने खेळून ६७७ विकेट्स घेतल्या होत्या
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ कारणाने लांबलीये वनडे संघाची संघनिवड; महत्त्वाची माहिती आली समोर
२०२१ गाजवणारे टॉप टी२० फलंदाज; भारतीयांनी केली सपशेल निराशा