---Advertisement---

ऑस्ट्रेलियाच्या पठ्ठ्यानं वयाच्या ३२ व्या वर्षी पदार्पण गाजवलं! ७ धावांत ६ विकेट्स घेत विश्वविक्रम केले नावावर

On: मंगळवार, डिसेंबर 28, 2021 2:14 PM
Scott Boland
---Advertisement---

मेलबर्न। ऍशेस मालिका २०२१-२२ (Ashes Series) मधील तिसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला एक डाव आणि १४ धावांनी पराभूत करत जिंकला. याबरोबरच यजमान ऑस्ट्रेलियाने ५ सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेत ऍशेस ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या सामन्यातील ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा नायक ठरला तो पदार्पणवीर स्कॉट बोलंड (Scott Boland). त्याच्या अप्रतिम कामगिरीबद्दल त्याला सामनावीर पुरस्कारही देण्यात आला.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघातील (Australia vs England) तिसरा कसोटी सामना बॉक्सिंग डे कसोटी सामना होता. या सामन्यातील दुसऱ्या डावात ३२ वर्षीय बोलंडने ४ षटके गोलंदाजी करताना ७ धावा देत तब्बल ६ विकेट्स घेतल्या. त्याने या ४ षटकांतील १ षटक निर्धाव देखील टाकले. त्यामुळे त्याने अनेक विक्रम त्याच्या नावावर केले आहेत.

विशेष म्हणजे बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या काही दिवसांपूर्वी अचानक स्कॉट बोलंडला ऑस्ट्रेलिया क्रिकेटकडून बोलावणं आलं आणि लगेचच त्याला त्याच्या घरच्या मैदानावरच कसोटी पदार्पणाचीही (Debut) संधी देण्यात आली. त्यानेही या संधीचे सोने केले आहे. त्याने तिसऱ्या ऍशेस सामन्यात दोन्ही डावात मिळून ७ विकेट्स घेतल्या.

https://twitter.com/ICC/status/1475652620698066944

बोलंडने अनेक विक्रम केले नावावर
बोलंड हा ऑस्ट्रेलियासाठी कसोटी क्रिकेट खेळणारा जेसन गिलेस्पीनंतरचा दुसराच ऍबोरिजनल (ऑस्ट्रेलियातील आदिवासी) क्रिकेटपटू ठरला आहे. तसेच तो ‘जॉनी मुलाघ मेडल’ मिळवणारा पहिला ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ठरला आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेटने गेल्यावर्षी बॉक्सिंग डे कसोटीत सामनावीर ठरलेल्या खेळाडूला ‘जॉनी मुलाघ मेडल’ देण्याचा निर्णय घेतला होता.

जॉनी मुलाघ हे ऑस्ट्रेलियाने केलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यात संघाचे कर्णधार होते. आता त्यांच्याच सन्मानार्थ हा पुरस्कार देण्यात येतो. सर्वात पहिले ‘जॉनी मुलाघ मेडल’ भारताच्या अजिंक्य रहाणेने गेल्यावर्षी मिळवले होते.

याशिवाय बोलंडचा कसोटी क्रिकेटमध्ये चेंडूंच्या तुलनेत सर्वात एका डावात ५ विकेट्स घेणारा गोलंदाज देखील ठरला आहे. त्याने याबाबतीत स्टुअर्ट ब्रॉड आणि एन्री टोशॅक यांची बरोबरी केली आहे. बोलंडने १९ चेंडूत ५ विकेट्स घेतल्या होत्या. टोशॅक यांनी देखील भारताविरुद्ध १९४७ साली ब्रिस्बेन येथे १९ चेंडूत ५ विकेट्स घेतल्या होत्या, तर ब्रॉडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१५ साली नॉटिंघम कसोटीत १९ चेंडूत ५ विकेट्स घेतल्या होत्या. 

तसेच बोलंड हा ऍशेस मालिकेतून कसोटी पदार्पण करताना एका डावात ६ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा एकूण १२ वा गोलंदाज ठरला आहे. 

अधिक वाचा – तिसऱ्याच दिवशी बॉक्सिंग डे कसोटी जिंकत ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिका घातली खिशात; इंग्लंडचा डावाने पराभव

विश्वविक्रमही नावावर
बोलंडने पदार्पणात विश्वविक्रमही नावावर केला आहे. तो पदार्पणातील कसोटी सामन्यात एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेताना सर्वात कमी धावा देणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या चार्ल्स टर्नर आणि दक्षिण आफ्रिकेच्या वर्नोन फिलँडर यांना मागे टाकले आहे. या दोघांनी आपल्या पदार्पणाच्या कसोटीत एका डावात ५ विकेट्स हॉल घेताना प्रत्येकी १५ धावा दिल्या होत्या. 

व्हिडिओ पाहा – त्या दिवशी विराटने शतक केलं अन् गंभीरने दिली भारी भेट| 

पदार्पणातील सामन्यात एका डावात ५ विकेट्स हॉल घेताना सर्वात कमी धावा देणारे गोलंदाज
७ धावा – स्कॉट बोलंड, विरुद्ध इंग्लंड, २०२१ (६ विकेट्स)
१५ धावा – चार्ल्स टर्नर, विरुद्ध इंग्लंड, १८८७, (६ विकेट्स)
१५ धावा – वर्नोन फिलँडर, विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २०११ (५ विकेट्स)
१६ धावा – जीम स्मिथ, विरुद्ध वेस्ट इंडिज, १९३५ (५ विकेट्स)
१९ धावा – चार्ल्स ऑब्रे स्मिथ, विरुद्ध दक्षिण आफ्रिका, १८८९ (५ विकेट्स)

महत्त्वाच्या बातम्या – 

आणखी एक भारतीय क्रिकेटपटू बनला बाबा! मोहित शर्माला प्राप्त झाले ‘पुत्ररत्न’

“… म्हणून आमचे गोलंदाज भरकटले”; एन्गिडीने सांगितले खराब गोलंदाजीचे कारण

ऍशेस मालिका तर गमावलीच, पण इंग्लंडने ‘या’ नकोशा विक्रमात केली बांगलादेशची बरोबरी

त्या दिवशी विराटने शतक केलं अन् गंभीरने दिली भारी भेट| Virat's First Century And Gambhir's Gift

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---