---Advertisement---

‘ही एक अद्भूत कसोटी, कर्णधारपदाची पर्वा न करता…’, विजयी पताका फडकवल्यानंतर स्टोक्सने मांडल्या भावना

On: रविवार, जून 5, 2022 10:44 PM
Ben-Stokes-ENG
---Advertisement---

सध्या न्यूझीलंडचा संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघाने न्यूझीलंडवर ५ गडी राखत विजय मिळवला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याचा हा कर्णधार म्हणून पहिला कसोटी विजय असल्याने विजय मिळवल्यानंतर त्याने भावूक प्रतिक्रिया दिली आहे. सोबतच त्याने जो रुटच्या शतकीय खेळीचे देखील कौतुक केले आहे.

बेन स्टोक्स (Ben Stokes) म्हणाला की, “ही एक अद्भुत कसोटी होती, विशेषत: लॉर्ड्सवर उन्हाळा नेहमीच खास असतो, कर्णधारपदाची पर्वा न करता विजयाने सुरुवात करणे ही नेहमीच विशेष भावना असते. शिवाय मॅक्युलमसोबत काम करताना मला पहिल्या आठवड्यात खूप आनंद झाला. आम्‍ही स्‍पष्‍टपणे उत्‍कृष्‍ट सुरुवात केली आहे.”

https://twitter.com/englandcricket/status/1533415411060031490

जो रूटबद्दल बेन स्टोक्स म्हणाला की, “१० हजार धावा आणि चौथ्या डावात शतक झळकावणारा तो विशेष खेळाडू आहे. पॉट्स आल्यावर त्याने जवळजवळ प्रत्येक वेळी विकेट घेतली. खेळाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टीकोन आश्चर्यकारक आहे आणि अशी चांगली सुरुवात पाहणे खूप रोमांचक आहे. हे असेच चालू राहील अशी आशा आहे. आम्हाला माहित आहे की, हे एका रात्रीत होणार नाही, याला वेळ लागेल परंतु हे सर्व छोट्या छोट्या गोष्टींबद्दल आहे. लीज आणि बेअरस्टो जसा खेळला तशीच वृत्ती आम्हाला हवी आहे. ब्रॉड आणि अँडरसन खरोखरच चांगले आहेत, ज्यांनी आम्हाला बर्‍याच महान गोष्टी करण्याची प्रेरणा दिली.”

दरम्यान, या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात १३२ धावांवर आटोपला. इंग्लंड संघाची कामगिरीही काहीशी तशीच होती. इंग्लंडचा संघ १४१ धावा करून बाद झाला. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात २८५ धावा केल्या. इंग्लंडने ५ गडी राखत २७९ धावा करून सामना जिंकला. सामना जिंकल्यानंतर इंग्लंडच्या संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘…तो निव्वळ वेडेपणा होता’, बेबी एबीने शेअर केली सचिनच्या पहिल्या भेटीची आठवण

‘दबावाच्या परिस्थितीत शांत राहणे मी धोनीकडून शिकलो’, IPL पदार्पणात ४ विकेट्स घेणाऱ्या खेळाडूचे बोल

‘तुझ्या दुधी भोपळ्याची साईजही तुझ्या…’, म्हणत विश्वविजेत्या भारतीय खेळाडूने उडवली चहलची खिल्ली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---