जगातील सर्वात प्रतिष्ठेची कसोटी मालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऍशेस मालिकेच्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात यजमान इंग्लंड संघाने वर्चस्व गाजवले. ऑस्ट्रेलिया संघाचे उर्वरित पाच फलंदाज केवळ 75 धावांमध्ये त्यांनी माघारी पाठवले. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा शतकवीर फलंदाज उस्मान ख्वाजा याला बाद करण्यासाठी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने एक आगळीवेगळी क्षेत्ररक्षणाची रचना केली होती.
https://www.instagram.com/reel/CtobY_euOy0/?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==
ऍजबस्टन येथे खेळल्या जात असलेल्या या कसोटीच्या पहिल्या दिवशी यजमान इंग्लंडने 393 धावांवर आपला डाव घोषित केला होता. त्याच्या उत्तरात ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी 5 बाद 311 अशी मजल मारलेली. तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियासाठी नाबाद शतकवीर उस्मान ख्वाजा याने सुरुवात केली. तो ऑस्ट्रेलियाचा डाव पुढे घेऊन जात असताना इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने त्याला बाल करण्यासाठी योग्य क्षेत्ररक्षण लावले. ओली रॉबीन्सन गोलंदाजी करत असताना त्याने खेळपट्टीच्या दोन्ही बाजूने प्रत्येकी तीन खेळाडू उभे केले. या रणनीतीनुसार झेल देण्यासारखा चेंडू टाकण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचे त्याने भासवले. मात्र, यावेळी त्याने अचूक यॉर्कर टाकत ख्वाजाचा त्रिफळा उडवला. इंग्लंड संघाच्या या योजनेचे सोशल मीडियावर चांगलेच कौतुक होत आहे.
SIX catchers in and the plan works 👏
Khawaja gone for 141.
COME ON ENGLAND! 🏴 #EnglandCricket | #Ashes pic.twitter.com/6MLJcQxzCX
— England Cricket (@englandcricket) June 18, 2023
या सामनचा विचार केल्यास इंग्लंडने पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. जो रूटने इंग्लंडच्या डावात नाबाद शतक झळकावले. त्याच्याबरोबर जॉनी बेअरस्टो व झॅक क्राऊली यांनी अर्धशतके झळकावली. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियासाठी उस्मान ख्वाजा याने 141 धावांची खेळी केली. तर ऍलेक्स केरी याने देखील अर्धशतक पूर्ण करत ऑस्ट्रेलियाला 386 पर्यंत पोहोचवले. त्यामुळे इंग्लंडला सात धावांची नाममात्र आघाडी मिळाली.
(Ben Stokes And England Took Usman Khwaja Wicket With Perfect Planning In Ashes 2023 Edgebaston Test)
महत्वाच्या बातम्या –
बहु झाल्या लीग! आणखी एका देशात सुरू होतेय क्रिकेट लीग, नामांकित खेळाडू होणार सहभागी
अँडरसन काय थांबेना! केरीच्या यष्ट्या उद्ध्वस्त करत प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पूर्ण केले 1100 बळी