---Advertisement---

काय म्हणायचे आता? स्टोक्सने टाकले तब्बल १४ नो बॉल? मात्र, पंचांचे लक्षच नव्हते!

On: गुरूवार, डिसेंबर 9, 2021 2:11 PM
ben-stokes-no-ball
---Advertisement---

प्रतिष्ठित ऍशेस मालिकेला जोरदार प्रारंभ झाला आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही बलाढ्य संघ ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आमनेसामने आले आहेत. या मालिकेतील पहिला कसोटी सामना ब्रिस्बेनच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी (८ डिसेंबर) ऑस्ट्रेलिया संघातील गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी (९ डिसेंबर) ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचा जलवा पाहायला मिळाला आहे. दरम्यान दुसऱ्या दिवशी पंचांकडून मोठ्या चुक होत असल्याचे दिसून आले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांनी पंचांवर जोरदार टीका केली आहे.

तर झाले असे की, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बेन स्टोक्सने अप्रतिम चेंडू टाकला, ज्यावर डेविड वॉर्नर बाद झाला होता. त्यावेळी तो अवघ्या १७ धावांवर फलंदाजी करत होता. परंतु, जेव्हा रिप्ले घेण्यात आला, त्यामध्ये तो चेंडू नो बॉल असल्याचे आढळून आले. अशाप्रकारे डेविड वॉर्नरला जीवनदान मिळाले. परंतु, त्यानंतर एक धक्कादायक बाब समोर आली. त्या षटकातील प्रत्येक चेंडू नो बॉल होता. मात्र, पंचांनी त्यावर लक्ष दिले नाही. डेव्हिड वॉर्नरला बाद करण्यापूर्वी बेन स्टोक्सने तब्बल १४ नो चेंडू टाकले होते.

याबाबत बोलताना ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पाँटिंग म्हणाले की, “जर कोणाला नो बॉलची पडताळणी करण्याची जबाबदारी दिली असेल आणि तो तसे करत नसेल तर ही अत्यंत खराब पंचगिरी आहे. ज्या षटकात त्याने वॉर्नरला बाद केले.  त्यापूर्वीदेखील त्याने अनेक नो बॉल टाकले होते. जर पंचांनी आधीच लक्ष दिले असते तर, त्याने नो बॉल टाकलाच नसता आणि वॉर्नर बाद झालाच नसता. मला हेच जाणून घ्यायचे आहे की, त्याने टाकलेल्या नो बॉलची दाखल का घेतली गेली नाही.”

ऑस्ट्रेलिया संघाने घेतली १९६ धावांची आघाडी

या सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंड संघाचा डाव अवघ्या १४७ धावांवर संपुष्टात आला होता. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया संघाकडून ट्रेविस हेड नाबाद ११२ धावांची खेळी करत नाबाद आहे. तर डेविड वॉर्नरने ९४ धावांचे योगदान दिले. तसेच मार्नस लाबुशेनने ७४ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. ऑस्ट्रेलिया संघाने दुसऱ्या दिवस अखेर ७ बाद ३४३ धावा केल्या आहेत. तसेच पहिल्या डावात १९६ धावांची आघाडी घेतली.

महत्वाच्या बातम्या:

धक्कादायक! विराटने स्वत:हून नाही सोडली वनडेची कॅप्टन्सी, बीसीसीआयचे म्हणणे न ऐकल्याने झाली हाकालपट्टी?

हार्दिकने दिले अकाली निवृत्तीचे संकेत; ‘या’ कारणाने घेऊ शकतो निर्णय

‘बिगिनिंग ऑफ हिटमॅन्स एरा’, रोहित भारताच्या वनडे संघाचा नवा कर्णधार बनल्याने ट्वीटरवर प्रतिक्रियांचा पूर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---