इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना सुरू आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेर इंग्लंडचा संघ पहिल्या डावात न्यूझीलंडपेक्षा ६५ धावांनी मागे आहे. इंग्लंडकडून जॉनी बेयरस्टो (१३० धावा) आणि जेमी ओव्हरटन (८९ धावा) फलंदाजी करत आहेत. दरम्यान इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने छोटेखानी खेळी करत दिग्गजांच्या यादीत उडी घेतली आहे.
बेन स्टोक्स बनला इंग्लंडचा पहिलाच फलंदाज
न्यूझीलंडच्या ३३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडकडून कर्णधार स्टोक्सला (Ben Stokes) केवळ १८ धावा करता आल्या. १३ चेंडू खेळताना १ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने त्याने ही खेळी केली. आपल्या या छोटेखानी खेळीदरम्यान एक षटकार मारत त्याने कसोटी क्रिकेटमधील आपले १०० षटकार (Hundred Sixes In Test) पूर्ण केले आहेत. यासह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये १०० षटकार पूर्ण करणारा जगातील तिसरा फलंदाज व इंग्लंडचा पहिलाच फलंदाज बनण्याचा मान मिळवला आहे.
स्टोक्सपूर्वी ऍडम गिलख्रिस्ट आणि ब्रेंडन मॅक्यूलम (Brendon McCullum) यांनी कसोटी क्रिकेटमध्ये षटकारांची शंभरी पूर्ण केली होती. न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू ब्रेंडन मॅक्यूलम याने त्याच्या कसोटी कारकिर्दीदरम्यान १०७ षटकार मारले होते. तर माजी ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक ऍडम गिलख्रिस्टने १०० षटकार ठोकले होते.
Ben Stokes is inching towards the #1 spot 📈#ENGvNZ | #WTC23 pic.twitter.com/ZfeBQwu03D
— ICC (@ICC) June 25, 2022
मोडला इंग्लंडच्या प्रशिक्षकाचाच विक्रम
याखेरीज स्टोक्स कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद शंभर षटकार पूर्ण करणारा दुसरा फलंदाजही बनला आहे. याबाबतीत त्याने ब्रेंडन मॅक्यूलमला मागे सोडले आहे. मॅक्यूलमने १७० डावांमध्ये कसोटीतील शंभर षटकार पूर्ण केले होते. मॅक्यूलम सध्या इंग्लंड संघाचा प्रशिक्षक आहे. मात्र स्टोक्सने यासाठी केवळ १५१ डाव घेतले आहेत. असे असले तरीही, या यादीत गिलख्रिस्ट प्रथम स्थानी असून त्याने १३० डावांमध्ये हा पराक्रम केला होता.
शंभर षटकार पूर्ण करण्यासाठी लागलेले सर्वात डाव
१३०- ऍडम गिलख्रिस्ट
१५१- बेन स्टोक्स
१७०- ब्रेंडन मॅक्कूलम
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
सो क्यूट! खूप दिवसांनी पत्नीला भेटला सूर्यकुमार यादव, दिसताच मारली कडकडून मिठी- PHOTO
SL vs AUS: ऑस्ट्रेलियाची विजयी अखेर, मात्र मालिका नावावर करत श्रीलंकेने रचला इतिहास
लिसेस्टरशायर विरुद्ध भारत: चालू सामन्यात ‘लॉर्ड’ ठाकूरला दिला धक्का, त्यानंतर जे झाले ते…