---Advertisement---

तब्बल ७ लाख रुपयांना पडली होती एक धाव, आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा क्रिकेटर

On: मंगळवार, ऑगस्ट 25, 2020 8:27 AM
---Advertisement---

२०१८ आयपीएलमधून राजस्थान राॅयल्स संघ एलिमीनेटरमधून बाहेर पडला होता. त्यांना केकेआरकडून २५ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते.

या संघात तेव्हा सर्वाधिक चर्चा असलेल्या बेन स्टोक्सला राजस्थानने संघात घेतले होते. त्यासाठी अतिशय मोठी रक्कम राजस्थानने मोजली होती.

याचमुळे २०१८ आयपीएलमध्ये एक धाव सर्वाधिक रुपयांना पडली ती राजस्थान राॅयल्सच्या बेन स्टोक्सचीच. १३ सामन्यात त्याने केवळ १६.३३ च्या सरासरीने १९६ धावा केल्या होत्या. त्यात त्याला साधे एकही अर्धशतक करता आले नाही.

तो २०१७ आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू होता तर २०१८ आयपीएलमध्ये तो सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला. त्याला लिलावात तब्बल १.९६ मिलियन डाॅलर किंमत देऊन राजस्थानने संघात घेतले. त्याची एक धाव जवळपास १०, ००० डाॅलरला पडली. याचाच अर्थ तेव्हाच्या डाॅलरच्या किंतीप्रमाणे त्याची एक धाव ७ लाखांच्या आसपास गेली होती.

गोलंदाजीतही त्याने १३ सामन्यात ८ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच तो कसोटी सामने खेळण्यासाठी अर्ध्यातूनच मायदेशी परतला होता.

विरोधाभास म्हणजे हैद्राबादच्या केन विलियमसनची एक धाव २०१८ हंगामात केवळ ६५० डाॅलरला गेली होती. त्याने ७३५ धावा  २०१८ हंगामात केल्या होत्या. त्या हंगामात सर्वाधिक धावा त्याच्याच नावावर होत्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment