ऍशेस 2023 च्या अखेरच्या दिवशी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दोघेही विजयासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. ऑस्ट्रेलिया संघाला विजयासाठी मिळालेल्या 384 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया मजबुतीने सामन्यात टिकून आहे. पावसामुळे पाचव्या दिवसाचा खेळ थांबला असला तरी ऑस्ट्रेलिया सध्या सामन्यात पुढे दिसते. असे असताना इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज स्टीव्ह स्मिथ याचा मोक्याच्या क्षणी झेल सोडला. त्यामुळे अनेकांना दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिब्स याची आठवण झाली.
सामन्याच्या चौथ्या दिवशी उस्मान ख्वाजा व डेव्हिड वॉर्नर यांनी शतकी भागीदारी दिल्यानंतर पाचव्या दिवशी सकाळी हे दोघे लवकर बाद झाले. त्या पाठोपाठ मार्नस लॅब्युशेन याला बाद करण्यात यश आल्याने इंग्लंडने सामन्यावर पकड बनवली. मात्र, त्यानंतर ट्रेविस हेड व स्टीव्ह स्मिथ यांनी अर्धशतकी भागीदारी केली.
Ben Stokes fumbles the celebration after taking Steven Smith's catch.
A big moment in the Ashes!pic.twitter.com/JNZqmekZmi
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 31, 2023
लंचसाठी ब्रेक झाल्यानंतर पावसामुळे खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 3 बाद 238 अशी मजल मारली होती. लंचसाठी खेळ थांबण्यापूर्वी इंग्लंड संघाकडे स्मिथ याला बाद करण्याची चांगली संधी चालून आली होती. मोईन अली याच्या चेंडूवर स्मिथच्या बॅटची कड घेऊन उडालेला झेल स्टोक्स पकडू शकला नाही.
त्याने हा झेल सोडल्यानंतर अनेक जण या झेलाची तुलना हर्षल गिब्स याने 1999 वनडे विश्वचषकात सोडलेल्या स्टीव्ह वॉ याच्या झेलाशी करत आहेत. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया संघ अडचणीत असताना वॉ याच्या खेळीच्या सुरुवातीलाच दक्षिण आफ्रिकेच्या गिब्सने त्याचा सोपा झेल सोडला. तेव्हा वॉ याने तु झेल नाही तर विश्वचषक सोडला असे म्हणत, शानदार शतक झळकावत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.
(Ben Stokes Dropped Steve Smith Catch In Oval Test People Said It’s Like Gibbs)
महत्वाच्या बातम्या –
ASHES 2023 । चौथ्या दिवसाखेर इंग्लिश चाहत्याचा ख्वाजाशी पंगा! लॅबुशेननं मागे वळून काय केलं पाहाच
धोनीने कलेक्शनमधून बाहेर काढली ‘ही’ जबरदस्त मसल कार, रांचीत ड्राईव्ह करतानाचा व्हिडिओ व्हायरल