अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील शेवटचा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुरुवारी (४ मार्च) सुरु झाला. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी मैदानात वाद होताना दिसले. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्स सामना सुरु असतानाच एकमेकांना भिडले होते. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. आता या घटनेबद्दल भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने मोठा खुलासा केला आहे.
नक्की काय झाले?
झाले असे की पहिल्या दिवशी इंग्लंड संघ पहिल्या डावात फलंदाजी करत असताना डावातील १५ वे षटक युवा गोलंदाज मोहम्मद सिराज टाकत होता. सिराजने त्याच्या षटकातील पहिलाच चेंडू अतिशय वेगाने टाकला, ज्यावर स्टोक्सला शॉट मारता आला नाही. पंचांनी तो चेंडू नो बॉल असल्याचेही घोषित केले. यानंतर सिराज आणि स्टोक्समध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे दिसले.
त्यानंतर लगेचच विराट मध्ये पडला. त्यामुळे नंतर विराट आणि स्टोक्समध्येच शाब्दिक युद्ध पेटले. काही वेळ त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर पंच नितीन मेनन यांनी मध्यस्थी करत त्यांचा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.
स्टोक्सने वापरले अपशब्द
या शाब्दिक युद्धाबद्दल पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर सिराजने प्रतिक्रिया दिली. त्याला प्रेझेंटेटर मुरली कार्तिकने या घटनेबद्दल विचारले, तेव्हा सिराज म्हणाला, ‘बेन स्टोक्सने मला शिवी दिली. मी त्याबद्दल विराट भाईला सांगितले. त्यानंतर विराटनेच पुढच्या गोष्टी सांभाळल्या. पण या गोष्टी मैदानात होतच राहातात, त्यात काही मोठी गोष्ट नाही.’
तसेच त्याला भारताच्या गोलंदाजीबद्दल विचारले असता तो म्हणाला, ‘खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होती, चेंडू बॅटवर चांगला येत होता. त्यामुळे आम्ही संयमाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.’
https://twitter.com/Vamsivardhan_/status/1367344566429388804
#INDvsENG #ViratKohli#benstokes @CricCrazyJohnshttps://t.co/J9DGFNmfCh
— ???????????????? ???????? (@satzcricket) March 4, 2021
सिराजची चांगली कामगिरी
या सामन्यात सिराजला जसप्रीत बुमराहऐवजी अंतिम ११ जणांच्या भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. त्यानेही या संधीचा पूर्ण वापर करताना पहिल्या डावात ३ विकेट्स घेतल्या. त्याने जॉनी बेअरस्टो (२८) आणि जो रुट (५) या दोन प्रमुख फलंदाजांना बाद केले.
पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व
या सामन्यात पहिल्या दिवसाखेर भारताने पहिल्या डावात १२ षटकात १ बाद २४ धावा केल्या आहे. पहिल्या दिवसाखेर रोहित शर्मा ८ धावांवर आणि चेतेश्वर पुजारा १५ धावांवर नाबाद आहेत.
त्यापूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडला पहिल्या डावात ७५.५ षटकात सर्वबाद २०५ धावाच करता आल्या आहेत. इंग्लंडकडून या डावात बेन स्टोक्सने सर्वाधिक ५५ धावा केल्या. तसेच डॅनियल लॉरेन्सने ४६ धावांची खेळी केली. अन्य कोणत्याही फलंदाजाला ३० धावांचा टप्पा पार करता आला नाही.
भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर आर अश्विनने ३ विकेट्स, मोहम्मद सिराजने २ आणि वॉशिंग्टन सुंदरने १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
पोलार्डने सहा षटकरांच्या विक्रमाची बरोबरी केल्यावर युवराजने दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाला…
जसप्रीत बुमराहच्या लग्नाचे ठिकाण ठरले? ‘या’ स्थळी होणार शुभमंगल
इम्रान ताहिरची संवेदनशीलता, विकेट घेताच ‘ही’ कृती करत वाहिली मित्राला श्रध्दांजली






