इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात पुढच्या महिन्यात ऍशेज मालिकेला सुरुवात होणार आहे. इंग्लंज संघाचा दिग्गज अष्टपैलू बेन स्टोक्स पुढच्या महिन्यात होणाऱ्या या ऍशेस मालिकेतून संघात पुनराजमन करण्यासाठी तयार आहे. आगामी मालिकेसाठी तो नेट्समध्ये सध्या नियमित घाम गाळत आहे. स्टोक्सने मागच्या काही महिन्यांपूर्वी क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली होती. त्यानंतर तो आता बऱ्याच दिवसांनी मैदानावर इंग्लंड संघासाठी खेळताना दिसणार आहे.
स्टोक्सने यावर्षी जुलै महिन्यान क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली होती. यावेळी त्याने ही विश्रांती घेण्यामागे मानसिक आरोग्याचे कारण सांगितले होते. तसेच यादरम्यान त्याने त्याच्या हाताच्या बोटाला झालेल्या दुखापतीवर देखील शस्त्रक्रिया करून घेतली. त्याने जवळपास एक महिन्यापूर्वी पुन्हा क्रिकेटच्या सरावाला सुरुवात केली आणि आता पुढच्या महिन्यात सुरू होणाऱ्या ऍशेस मालिकेत तो इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याला या मालिकेसाठी इंग्लंड संघात स्थान देखील दिले गेले आहे.
स्टोक्स ऍशेस मालिकेत चांगले प्रदर्शन करण्याच्या प्रयत्नात आहे आणि यासाठी तो नेट्समध्ये कसून सराव करत आहे. इंग्लंड आणि वेस्ल क्रिकेट बोर्डने (ईसीबी) गुरुवारी (२५ नोव्हेंबर) त्यांच्या अधिकृट ट्वीटर खात्यावरून स्टोक्सचा गॅबाच्या मैदानावरील सराव करतानाच एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Hitting them clean @benstokes38 💥 pic.twitter.com/RFHvvGgTYP
— England Cricket (@englandcricket) November 25, 2021
आगामी ऍशेस मालिका पुढच्या महिन्यात ८ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर खेळला जाईल. यापूर्वी इंग्लंड संघाने आपल्याच देशाच्या अ संघासोबत सराव सामन्यात सहभाग घेतला होता. पण पावसामुळे हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. आता स्टोक्सला इंग्लंड संघाकडून खेळण्यासाठी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याची वाट पाहावी लागणार आहे. यापूर्वी इंग्लंड संघ ३० नोव्हेंबरपासून चार दिवसीय इंट्रा स्क्वाड सामना खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘मी आता सांगू शकतो का?’, रिटेंशनविषयी सीएसकेने विचारलेल्या प्रश्नावर जडेजाची मजेशीर प्रतिक्रिया
‘तर भारत मायदेशात डीआरएस वापरावर बंदी आणू शकतो’, न्यूझीलंडच्या अष्टपैलूने घेतली फिरकी
लहानपणी अनेकवेळा रॅगिंग झालेला तरीही न खचता पुढे भारताचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक झालेला रैना