---Advertisement---

ऍशेस मालिकेसाठी सज्ज होतोय बेन स्टोक्स, गाबामध्ये इंग्लिश गोलंदाजांची केली जोरदार धुलाई- Video

On: शुक्रवार, नोव्हेंबर 26, 2021 11:29 PM
---Advertisement---

इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू आणि कसोटीचा उपकर्णधार बेन स्टोक्स मोठ्या विश्रांतीनंतर आगामी ऍशेस मालिकेत पुनरागमन करणार आहे. स्टोक्स काही महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर होता आणि आता स्टोक्सला त्याची लय परत मिळवण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. कारण इंग्लंड क्रिकेटने ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात बेन स्टोक्स फलंदाजी करताना दिसत आहे. उत्कृष्ट ताळमेळासोबत तो गाबाच्या मैदानावर फटके मारताना दिसत आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या चिंतेत नक्कीच भर पडणार आहे.

बेन स्टोक्सने अनिश्चित काळासाठी क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती
इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने भारता विरुद्ध होणाऱ्या मालिकेतल्या पहिल्या कसोटीच्या थोडे दिवस आधी क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतोय, असं जाहीर केलेलं. स्टोक्सने मानसिक स्वास्थ्यासाठी विश्रांती घेतली होती. तसेच या काळात त्याने डाव्या हाताच्या बोटाच्या दुखापतीमुळे त्याची शस्त्रक्रिया देखील केली होती. आयपीएल २०२१च्या पहिल्या टप्प्यात त्याला ही दुखापत झाली होती. यामुळे स्टोक्स टी-२० विश्वचषका २०२१ चा (T20 World Cup) भाग नव्हता. तसेच आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यातही खेळला नव्हता.

मागच्या महिन्यात त्याने इंस्टाग्रामवर क्रिकेटच्या सरावाचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यामुळे त्याला लगेच ऍशेस मालिकेसाठी संघात घेण्यात आले आहे.

महत्त्वाचे म्हणजे, स्टोक्सने २०१३-२०१४ च्या ऍशेस मालिकेतून कसोटीत पदार्पण केले होते. स्टोक्सने लीड्समध्ये आपल्या कारकिर्दीतला सर्वोत्तम डाव खेळून ऑस्ट्रेलियाविरुद्ध अप्रतिम विजय मिळवून दिला होता. त्यात त्याने नाबाद १३५ धावा केल्या होत्या. परंतु इंग्लंडला तेव्हा ५-० ने पराभव स्वीकारावा लागला होता.

पण स्टोक्सने पुढे आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीमधून सगळ्यांना प्रभावित केलं आहे. त्याने स्वतःला जगातील सर्वश्रेष्ठ अष्टपैलू खेळाडू म्हणून सिद्ध करून दाखवलं आहे. आयसीसी विश्वचषक २०१९ (ICC Cricket World Cup 2019) च्या अंतिम सामन्यात त्याला सामनावीर ठरवण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

ग्रीन पार्कच्या वादात राहिलेल्या क्युरेटरचा खुलासा; म्हणाला, ‘मला इलेक्ट्रिशियन वरून पिच क्युरेटर करण्यात आले’

चला थोडं हसूया! सूर्यकुमारच्या शोमध्ये श्रेयसची भरपूर मस्ती, बीसीसीआयने शेअर केला मुलाखतीचा व्हिडिओ

‘हे’ चौघे द्रविडच्या निरोप सामन्यात होते त्याचे टीममेट्स, आता त्याच्याच प्रशिक्षणाखाली खेळतायत कानपूर कसोटी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---