---Advertisement---

बेन स्टोक्सचा या मोठ्या पुरस्काराने झाला मोठा सन्मान…

On: मंगळवार, डिसेंबर 17, 2019 7:32 PM
---Advertisement---

इंग्लंडचा (England) अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सला (Ben Stokes) मोठा सन्मान मिळाला आहे. आयसीसी विश्वचषकाचे विजेतेपद इंग्लंडला मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्टोक्सला बीबीसीने 2019 मध्ये ‘स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर’ (Sports Person of The Year) म्हणून गौरविले आहे.

हा मान मिळवणारा स्टोक्स हा पाचवा क्रिकेटपटू आहे. तसेच अँड्र्यू फ्लिंटाॅफनंतर (Andrew Flintoff) हा सन्मान मिळवणारा तो पहिलाच क्रिकेटपटू आहे. फ्लिंटॉफला 2005 मध्ये हा पुरस्कार मिळाला होता.

1954 पासून सुरू झालेल्या या सन्मानासाठी स्टोक्सने 6 वेळा फॉर्म्युला वन विश्वविजेता लुईस हॅमिल्टन (Lewis Hamilton) आणि 200 मीटरमध्ये जागतिक अजिंक्यपद मिळवणारी धावपटू दीना आशर स्मिथचा (Dina Asher-Smith) पराभव केला.

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडच्या विजेतेपदासाठी स्टोक्सची महत्त्वाची भूमिका होती. इंग्लंडने बाऊंड्री काउंटच्या जोरावर न्यूझीलंडला अंतिम फेरीत पराभूत केले होते. यानंतर ऍशेस मालिकेतही स्टोक्सने उत्तम कामगिरी बजावली. त्यामुळे लोकांनी त्याला मत दिले.

“दोन वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यातील मला एका कठीण काळातून जावे लागले होते. त्यानंतर बर्‍याच लोकांनी मला मदत केली,” असे स्टोक्स म्हणाला.

2 वर्षांपूर्वी स्टोक्स वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. नाईटक्लबमध्ये झालेल्या भांडणामुळे त्याला बऱ्याचवेळा कोर्टात जावे लागले होते. यादरम्यान, त्याला त्याच्या सहकाऱ्यांचा पाठिंबा देखील मिळाला.

बेन स्टोक्सने 59 कसोटी सामने, 95 वनडे, 23 टी20 आणि 34 आयपीएल सामने खेळला आहे. यादरम्यान त्याने कसोटीत 3738 धावा केल्या आहेत. तर, वनडे आणि टी20 मध्ये त्याने अनुक्रमे 2682 आणि 232 धावा केल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---