इंग्लंड संघाने आपल्या पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा त्यांच्याच मैदानावर दारुण पराभव केला. इंग्लंडने रावळपिंडी कसोटी सामना 74 धावांनी जिंकला आणि आता त्यांची नजर मुलतान येथे शुक्रवारपासून (दि. 9 डिसेंबर) खेळल्या जाणाऱ्या सामन्यावर असणार आहे. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली खेळणारा इंग्लंड संघ हा सामना जिंकून कसोटी मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न करेल. मात्र, हा सामना सुरु होण्याच्या आधी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने एक खळबळजनक विधान केेले आहे.
इंग्लंड आणि पाकिस्तान संघात कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना मुलतान येथे खेळवला जाणार आहे. मात्र, मुलतान येथील कसोटी सामन्याच्या आधी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) याने सर्वांना थक्क करणारे विधान केले. स्टोक्स म्हणाला की तो फलंदाजी न करताही डाव घोषीत करु शकतो. रावळपिंडी कसोटीमध्ये इंग्लंडने 7 गडी गमावत 264 धावांवर आपला दुसरा डाव घोषीत केला आणि पाकिस्तानपुढे 343 धावांचे आव्हान ठेवले. पाकिस्तान संघ चौथ्या दिवशीच फलंदाजीसाठी मैदानात उतरलेला आणि त्यांच्याजवळ हे आव्हान मोडीत काढण्यासाठी पूर्ण एक दिवस होता.
स्टोक्सच्या निर्णयाची सर्वत्र प्रशंसा
पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसरा डाव घोषीत केल्याने बेन स्टोक्सच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत होते. कोणलाही समजत नव्हते की त्याने इतक्या लवकर डाव का घोषीत केला. मात्र, इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्याचा निर्णय योग्य ठरवला आणि पाकिस्तान संघाची धावसंख्या 268वर रोखण्यात यशस्वी झाले. यानंतर स्टोक्सच्या निर्णयाची सगळीकडे स्तुती केली गेली. या निर्णयानंतर त्याने सिद्ध केले की त्याला सामना निकाली लागलेला जास्त आवडतो.
इंग्लंडचा कसोटी संघ 17 वर्षांनी पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी आला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी धुमाकूळ घातला. पहिल्या डावात त्यांच्या 4 फलंदाजांनी शतके झळकावली. मुलतान कसोटी जिंकून ही मालिका खिशात घालण्याचा मानस इंग्लंड संघाचा असणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलच्या ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमात आला ट्विस्ट! या अटीवर खेळवावा लागणार ‘तो’ खेळाडू
महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात होण्याचा मार्ग मोकळा; ‘या’ तारखेला ठोकणार शड्डू