सन २०१६ मध्ये झालेल्या टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजच्या कार्लोस ब्रेथवेटने इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सच्या चेंडूवर सलग ४ षटकार ठोकत आपल्या संघाला विश्वविजेता बनविले. खरे तर त्या ऐतिहासिक अंतिम सामन्यात वेस्ट इंडीजला शेवटच्या षटकात १९ धावांची गरज होती आणि इंग्लंडकडून बेन स्टोक्स अखेरचे षटक टाकण्यासाठी आला. ब्रेथवेटने अखेरच्या षटकातील पहिल्या चार चेंडूवर षटकार खेचत संघाला विजय मिळवून दिला होता. ही घटना म्हणजे स्टोक्सच्या आतापर्यंतच्या अप्रतिम कारकिर्दीतील सर्वात भळभळती जखम मानली जाते. मात्र, आता स्वतः स्टोक्सने या जखमेवर मलम लावण्याचे काम केले आहे.
स्टोक्सने घेतला बदला
सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या टी२० ब्लास्ट स्पर्धेत बेन स्टोक्स आणि कार्लोस ब्रेथवेटचा आमना-सामना झाला. यावेळी स्टोक्स फलंदाज तर, ब्रेथवेट गोलंदाज होता. २६ जून रोजी डरहॅम आणि बर्मिंघम दरम्यान झालेल्या टी२० ब्लास्ट सामन्यात स्टोक्सने ब्रेथवेटच्या ८ चेंडूच्या गोलंदाजीवर २ चौकार आणि २ षटकार लगावत २० धावा वसूल केल्या.
बेन स्टोक्सने कार्लोस ब्रेथवेटच्या एकाच षटकात २ षटकार आणि १ चौकारही लगावत १६ धावा करून आपला जुना हिशेब चुकता केला. या सामन्यात स्टोक्स डरहॅम तर, ब्रेथवेट बर्मिंघमकडून खेळत होता. डरहॅमने हा सामना २२ धावांनी जिंकला.
Brathwaite vs Ben Stokes 🔥 pic.twitter.com/UqCrKJBu0J
— ribas (@ribas30704098) June 26, 2021
दुखापतीनंतर केले पुनरागमन
दुखापतीनंतर पुनरागमन करताना स्टोक्सने या सामन्यात २० चेंडूत ३५ धावा केल्या, ज्यामध्ये २ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे इंग्लंडच्या या अष्टपैलूने शेवटच्या ५ चेंडूत २६ धावा केल्या. याशिवाय स्टोक्सने ३ षटकांत २७ धावा देऊन ४ बळी घेण्यात यश मिळवले. स्टोक्स गेले अडीच महिने बोटाला झालेल्या दुखापतीमुळे क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. आता तंदुरुस्त झाल्यानंतर स्टोक्स पुन्हा क्रिकेटमध्ये परतला असून, मैदानात उतरताच त्याने अष्टपैलू कामगिरीची झलक दाखवून दिली.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहितसोबत सलामीसाठी गावसकरांचा ‘या’ फलंदाजाला पाठिंबा
तिरंदाजी विश्वचषकात दीपिका कुमारीला घवघवीत यश, एकाच दिवशी जिंकले ३ सुवर्णपदकं