यावर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात आयसीसी वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. इंग्लंड विश्वचषक जिंकण्यासाठी काही मोजक्या प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. वनडे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर इंग्लंड संघासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. बेन स्टोक्स विश्वचषकासाठी आपली निवृत्ती मागे घेऊ शकतो.
यावर्षीच्या वनडे विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे. पण भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासह, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांसारखे बलाढ्य संघ देखील विजेतेपदासाठी दावेदार आहेत. इंग्लंड वनडे विश्वचषकाचा गतविजेता संघ असून यावर्षी विजेतेपद आपल्याकडे कायम ठेवण्यासाठी संघाचा प्रयत्न असेल. काही दिवसांपूर्वी अशी बातमी समोर आली होती की, इंग्लंडच्या वनडे संघाचा कर्णधार जोस बटलर याने प्रयत्न केले, तर बेन स्टोक्स वनडे निवृत्ती मागे घेऊ शकतो. आता याच पार्श्वभूमीवर द टेलिग्राफने सविस्तर वृत्त दिले आहे.
द टेलिग्राफच्या माहितीनुसार बेन स्टोक्स () वनडे विश्वचषक 2023 मध्ये इंग्लंडसाठी फलंदाजाच्या रुपात खेळू शकतो. पण यासाठी कर्णधार जोस बटलर याला प्रयत्न करावे लागू शकतात. स्टोक्सने मागच्या वर्षी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती आणि कसोटी संघाचे कर्णधारपद सांभाळत होता. पण येत्या काळात तो पुन्हा वनडे जर्सीत दिसू शकतो. पण स्टोक्स विश्वचषकात गोलंदाजी करेल, याची शक्यता कमीच आहे. फिटनेस आणि वर्कलोडच्या कारणास्तव हा निर्णय घेतला जाऊ शकतो.
स्टोक्सने वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन केले, तर त्याच्या गुडघ्याची दुखापत पुन्हा एकदा डोके वर काढू शकते. याच दुखापतीमुळे त्याने वनडे क्रिकेटमधून त्याने निवृत्ती घेतल्याचे सांगितले जाते. पण विश्वचषकाचे महत्व पाहता तो संघात पुनरागमन करू शकतो. दुसरीकडे इंडियन प्रीमियर लीगमध्ये मात्र त्याला माघार घ्यावी लागू शकते. वर्कलोड मॅनेज करण्यासाठी स्टोक्सला आयपीएलमधून माघार घ्यावी लागू शकते. एमएस धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग असणारा स्टोक्स आयपीएल 2023मध्ये जास्त योगदान देऊ शकला नव्हता. अशात सीएसके फ्रँचायझीला आगामी हंगामातही स्टोक्सकडून जास्त अपेक्षा ठेवून चालणार नाही. दरम्यानच्या काळात स्टोक्सच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया देखील पार पडू शकते. (Ben Stokes is ready to return for the World Cup.)
महत्वाच्या बातम्या –
BREAKING! श्रीलंकन क्रिकेटपटू अडचणीत, मॅच फिक्सिंग प्रकरणात न्यायलायाची मोठी कारवाई
प्रतीक्षा संपली! दक्षिण आफ्रिकेच्या वरिष्ठ संघात डेवाल्ड ब्रेविसची निवड, बलाढ्य देशाविरुद्ध खेळणार मायदेशातील मालिका