काल(२० जुलै) इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात मँचेस्टर येथे दुसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यानंतर आज आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत अव्वल क्रमांक पटकावला आहे.
स्टोक्सने मँचेस्टर कसोटीत शानदार अष्टपैलू कामगिरी केली आहे. त्याने या सामन्यात इंग्लंडकडून पहिल्या डावात १७६ धावांची दिडशतकी खेळी केली होती. तसेच दुसऱ्या डावात त्याने नाबाद ७८ धावा केल्या होत्या. याशिवाय त्याने ३ विकेट्सही घेतल्या होत्या.
स्टोक्स आता अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या कसोटी क्रमवारीत वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरला मागे टाकत अव्वल क्रमांकावर विराजमान झाला आहे. स्टोक्स हा अँड्र्यू फ्लिंटॉफनंतर अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर येणारा पहिला इंग्लंडचा क्रिकेटपटू आहे. मागील काही काळापासून होल्डर या क्रमवारीत अव्वल क्रमांकावर होता. मात्र आता त्याच्यात आणि होल्डरमध्ये ३८ गुणांचे अंतर पडले आहे. स्टोक्सचे ४९७ गुण आहेत. तर होल्डरचे ४५९ गुण आहेत.
अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या क्रमवारील स्टोक्स आणि होल्डरच्या पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर रविंद्र जडेजा आहे. तर मिशेल स्टार्क आणि आर अश्विन अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहे.
🚨 RANKINGS UPDATE 🚨
Ben Stokes is the new No.1 all-rounder 🤩
He is the first England player since Flintoff to be at the top of the @MRFWorldwide ICC Men's Test Player Rankings for all-rounders.
Full rankings: https://t.co/AIR0KN4yY5 pic.twitter.com/viRzJzuGiC
— ICC (@ICC) July 21, 2020
एवढेच नाही तर फलंदाजांच्या क्रमवारीतही स्टोक्सने मोठी भरारी घेतली आहे. तो ६ स्थानांनी पुढे आला असून पहिल्या ३ फलंदाजांमध्ये त्याने स्थान मिळवले आहे. तो आता स्टिव्ह स्मिथ आणि विराट कोहली पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. या क्रमांकावर मार्नस लॅब्यूशेनही आहे. स्टोक्स आणि लॅब्यूशेन यांचे प्रत्येकी ८२७ गुण आहेत. त्यामुळे ते विभागून तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
तसेच इंग्लंडकडून मँचेस्टर कसोटीत १२० धावांची खेळी करणारा डॉम सिब्लेनेही क्रमवारीत प्रगती करत ३५ वे स्थान मिळवले आहे.
या फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचे विराट कोहली (२ ऱ्या क्रमांकावर), चेतेश्वर पुजारा (८ व्या क्रमांकावर) आणि अजिंक्य रहाणे (१० व्या क्रमांकावर) पहिल्या १० फलंदाजांमध्ये आहेत.
Ben Stokes moves up to No.3 in the latest @MRFWorldwide ICC Men's Test Player Rankings for batting 💥
Full rankings: https://t.co/AIR0KN4yY5 pic.twitter.com/Id04MOEgjl
— ICC (@ICC) July 21, 2020
गोलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने पहिल्या १० गोलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे. तो ४ स्थानांची प्रगती करत १० व्या क्रमांकावर आला आहे. त्याने मँचेस्टर कसोटीत शानदार प्रदर्शन करताना ६ विकेट्स घेतल्या होत्या.
मात्र वेस्ट इंडिजचा कर्णधार होल्डरची मात्र गोलंदाजी क्रमवारीतही घसरण झाली आहे. आता तो दुसऱ्या क्रमांकावरुन तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा गोलंदाज निल वॅगनरची दुसऱ्या क्रमांकावर बढती झाली आहे. या क्रमवारीत अव्वल क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आहे.
🔹 Stuart Broad storms into top🔟
🔹 Jason Holder falls to No.3⃣The latest @MRFWorldwide ICC Men's Test Player Rankings for bowlers: https://t.co/AIR0KNm9PD pic.twitter.com/2scK477do8
— ICC (@ICC) July 21, 2020
या क्रमवारीत जसप्रीत बुमराह हा एकमेव गोलंदाज पहिल्या १० जणांमध्ये आहे. तो या क्रमवारीत ७ व्या क्रमांकावर आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
वायफाय टेक्निशियनची खिल्ली उडवणं मांजरेकरांना पडलं भलताच महागात, सोशल मीडियावर…
एवढ्या मोठ्या क्रिकेट बोर्डाकडे तब्बल १४.८२ कोटींची थकबाकी; ३० वेळा सांगूनही भरले नाहीत पैसे