मुंबई । इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात कोरोना विषाणूच्या सावटात सुरू असलेल्या कसोटी मालिकेच्या दुसर्या सामन्यात इंग्लिडने जोरदार पुनरागमन केले. त्यांनी वेस्ट इंडीज संघाला 113 धावांनी पराभूत केले आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम इंग्लंडला फलंदाजीस पाचारण केले होते. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने पहिला डाव 9 बाद 469 धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरादाखल वेस्ट इंडीजचा संघ पहिल्या डावात केवळ 287 धावा करू शकला. पाचव्या दिवशी दुसर्या डाव इंग्लंडच्या संघाने 3 विकेट्सवर 129 धावा घोषित केला आणि कॅरेबियन संघासमोर विजय मिळविण्यासाठी 312 धावांचे लक्ष्य ठेवले.
धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीज संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि वेस्ट इंडीज संघाचा दुसरा डाव 198 धावांवर आटोपला आणि इंग्लंड संघाने ११3 धावांनी विजय मिळविला.
इंग्लंडकडून, बेन स्टोक्सने सामन्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत पहिल्या डावात 176 आणि दुसऱ्या डावात नाबाद 78 धावा केल्या. बेन स्टोक्सने फलंदाजीसोबत गोलंदाजीतही चुणुक दाखवत 3 गडी बाद केले. या विजयासह इंग्लंडने मालिका 1-1 अशी बरोबरीत केली. आता शेवटचा कसोटी सामना 24 जुलैपासून मँचेस्टरमध्येच सुरू होईल.
अष्टपैलू बेन स्टोक्सने 5 व्या दिवशी आपल्या आक्रमक स्टाईलने फलंदाजी केली आणि अवघ्या 36 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकात बेन स्टोक्सने 2 षटकार आणि 2 चौकार ठोकले. त्याचा स्ट्राइक रेट 138.9 होता. यासह बेन स्टोक्स इंग्लंडसाठी सर्वात वेगवान कसोटी अर्धशतक ठोकणारा सलामीवीर ठरला.
ट्रेंडिंग घडामोडी –
मुंबई इंडियन्सचा स्टार पोलार्डची पत्नी ‘जेना’ घर चालविण्यासाठी अशी लावते हातभार
क्रिकेटर झालेत नाराज, १० महिन्यांपासून अध्यक्ष असलेला गांगुली करत नाही हे काम
प्रशिक्षणादरम्यान न्यूझीलंडच्या ‘या’ वेगवान गोलंदाजाची प्रकृती बिघडली






