---Advertisement---

बेन स्टोक्सने चोळले किवींच्या जखमेवर मीठ, वर्ल्डकपची आठवण जागवणारा व्हिडेओ पाहाच

On: सोमवार, जून 6, 2022 1:08 PM
Ben-Stokes-Viral-Video
---Advertisement---

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा धुव्वा उडवत ५ गडी राखून विजय मिळवला. यावेळी इंग्लंडचा फलंदाज जो रुट याने शतकी खेळी करत इंग्लंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मात्र, इंग्लंडच्या विजयापेक्षा सध्या बेन स्टोक्सचा एक विनोदी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओतून सर्वांना २०१९च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्याची आठवण होत आहे. 

लॉर्ड्सवर येथे खेळल्या जात असलेल्या इंग्लंड (England) विरुद्ध न्यूझीलंड (New Zeland) कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एक घटना घडली, ज्याने सर्वांना २०१९च्या विश्वचषक स्पर्धेची आठवण करून दिली. ही घटना इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील ४३ व्या षटकात घडली जेव्हा जो रूट (Joe Root) स्ट्रायकरवर होता आणि कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) नॉन-स्ट्रायकरवर शेवटी उभा होता. न्यूझीलंडचा गोलंदाज ट्रेंट बोल्टने (Trend Boult) या षटकाचा पहिला चेंडू टाकला, ज्यावर जो रूटने शॉट खेळला आणि बेन स्टोक्स धाव घेऊ पाहत होता, त्यामुळे तोही क्रीझच्या बाहेर गेला.

यावेळी न्यूझीलंडच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेने फेकला. हे पाहून बेन स्टोक्स नॉन-स्ट्रायकर एंडच्या दिशेने धावला, त्यादरम्यान चेंडू त्याच्या बॅटला लागला आणि त्याची दिशा बदलली. ही घटना घडताच बेन स्टोक्सने हात वर करत यात आपली चूक नसल्याचे निदर्शनास आणून दिले. मात्र, यावेळी दोन्ही संघातील खेळाडूंच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळाले. इंग्लंड संघाच्या ट्विटर अकाऊंटवरून हा मजेशीर व्हिडिओ शेअर करत त्याला ‘तुम्हाला माहिती आहे…’ असे कॅपशन देण्यात आले आहे.

दरम्यान, तिसर्‍या दिवशी घडलेली ही घटना पाहून सर्वांना वर्ल्ड कप २०१९ ची गोष्ट आठवली जिथे इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात असाच एक चेंडू बेन स्टोक्सच्या बॅटला लागला आणि सीमारेषा ओलांडून गेला. यादरम्यान इंग्लंड संघाला पूर्ण ६ धावा मिळाल्या आणि या घटनेमुळे इंग्लंडने पहिला विश्वचषकही जिंकला. एकीकडे इंग्लंडने पहिला विश्वचषक जिंकला असतानाच न्यूझीलंड संघाचे स्वप्न भंगले होते. वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये घडलेली ही घटनाही खूप वादात सापडली होती.

व्हॉट्सअपवर अपडंट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

दक्षिण आफ्रिकेला हरवत भारत रचणार मोठा विक्रम, पाकिस्तानपेक्षाही ठरणार वरचढ

लॉर्ड्स कसोटीतील विजयासह इंग्लंडला टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये फायदा, टीम इंडिया ‘या’ क्रमांकावर

चॅपेल प्रकरण झाले नसते, तर युवराज महान कर्णधार झाला असता, माजी संघसहकाऱ्याचा दावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---