युवकांना संधी, कसोटीवर लक्ष, भावूक संदेश देत बेन स्टोक्सची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

युवकांना संधी, कसोटीवर लक्ष, भावूक संदेश देत बेन स्टोक्सची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

इंग्लंडला २०१९ एकदिवसीय विश्वचषक जिंकवण्यासाठी सर्वात महत्वाची भूमिका पार पाडलेल्या बेन स्टोक्सने सोमवारी (१८ जुलै) एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. मंगळवारी (१९ जुलै) दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना खेळल्यानंतर स्टोक्स या प्रकारातून निवृत्ती होईल. स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून त्याने ही माहिती दिली आणि सोबतच निवृत्तीचे संविस्तर कारणही दिले आहे. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हवी असलेली शारीरिक आणि मानसिक गरज पाहता बेन स्टोक्स (Ben Stokes) एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे दिसते. त्याला नुकतेच काही दिवसांपूर्वी इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बनवले गेले आहे. अशात आता क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये खेळत राहणे त्याच्यासाठी शक्य नसल्याचेही स्टोक्सने स्पष्ट केले.

इंस्टाग्राम पोस्टमध्ये स्टोक्सने लिहिले आहे की, “मी मंगळवारी डरहममध्ये इंग्लंड संघासाठी एखदिवसीय क्रिकेटमधील शेवटचा सामना खेळले. या प्रकारातून मी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय खूप कठीण होता. संघातील सहकाऱ्यांसोबत खेळलेल्या प्रत्येक क्षणाचा मी पूर्ण आनंद घेतला आहे. आमचा प्रवास अप्रतिम राहिला.”

पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, “हा निर्णय घेणे जेवढे कठीण होते, त्याच्या तुलनेत हे स्वीकार करणे कठीण नव्हते की, या प्रकारात मी संघ आणि सहकाऱ्यांना १०० टक्के देऊ शकणार नाही. इंग्लंड संघाचा शर्ट घालणाऱ्या प्रत्येकाकडून यापेक्षा काहीच कमी अपेक्षित नाहीये.”

“माझ्यासाठी आता तिन्ही प्रकारांमध्ये खेळणे शक्य नाहीये. फक्त असे नाहीये की, माझे शरीर संघाचे वेळापत्रक आणि अपेक्षांवर खरे उतरत नाहीये. मला असेही वाटते की, मी त्या खेळाडूंची जागा घेत आहे, जे जॉस (बटलर) आणि इतर संघाला त्यांची पूर्ण साथ देऊ शकतात. आता वेळ आहे की, एखाद्या क्रिकेटपटूने पुढे यावे आणि आठवणी बनवाव्यात, जशा मी मागच्या ११ वर्षांमध्ये बनवल्या आहेत,” असेही स्टोक्सने पोस्टमध्ये लिहिले आहे.

दरम्यान, स्टोक्सच्या एकदिवसीय कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने एकूण १०४ सामने खेळले आहेत. यादरम्यान ३९.४४ च्या सरासरीने आणि ९५.२६ च्या स्ट्राईक रेटने २९१९ धावा केल्या आहेत. गोलंदाजाच्या रूपात त्याने ७४ विकेट्स घेतल्या आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

‘या’ खेळाडूने शूटींग खेळाच्या विश्वचषकात फडकावला तिंरगा, सुवर्णपदक जिंकताच केला मोठा विक्रम

इंग्लंड दौऱ्यातील पाच पराक्रम, जे टीम इंडियाला बनवतील टी-२० वर्ल्ड कप चॅम्पियन

भारीच ना! जे सचिन-धोनीलाही जमले नाही, ते रिषभ पंतने करून दाखवले, चाहत्यांकडून इंग्लंडमध्ये खास सत्कार

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.