इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स हा जगातील सध्याचा अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू क्रिकेटपटू मानला जातो. नुकतेच आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघासाठी सलग दोन सामन्यांत धुव्वादार खेळ केल्यानंतर तो सध्या चर्चेत आला आहे. तसेच त्याने शुक्रवारी(30 ऑक्टोबर) त्याच्या यशाचे रहस्यही उघड केले आहे.
बेन स्टोक्सने आयपीएल2020मध्ये राजस्थानकडून मुंबई इंडियन्स विरुद्ध शतकी खेळी केली तर किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध अर्धशतकी खेळी केली. तसेच याआधीही गेल्या वर्षभरात स्टोक्सची कामगिरी शानदार राहिली आहे. पण स्वतःच्या कर्तृत्वावर अजिबात खुश नसल्याचे तो सांगतो. कारण जर तो त्याच्यावर खुश झाला तर पुढील खेळ चांगला होत नाही, असे त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे एखाद्या खेळा नंतर पुढील खेळ कसा चांगला होईल हा विचार बेन स्टोक्स करीत असतो आणि हेच त्याच्या यशाचे कारण असल्याचे तो सांगतो.
बेन स्टोक्सने उघड केले यशाचे रहस्य
शुक्रवारी(30 ऑक्टोबर) किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यानंतर बेन स्टोक्सने गेल्या दोन वर्षांत तो एक चांगला क्रिकेटपटू कसा बनला हे सांगितले. तो म्हणाला, ‘सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनुभव. आपण जितके अधिक खेळत जातो तितके आपल्याला आपल्याबद्दल माहित होत जाते.’ स्टोक्स म्हणाला, ‘मला नेहमीच चांगला खेळ करायचा असतो. मी अजूनही माझ्या मजबूत बाबींवर काम करण्याचा प्रयत्न करीत असतो.ट
मोठ्या सामन्यात तो दबावमुक्त कसा असतो? असे स्टोक्सला विचारले गेले असता, तो म्हणाला, “खेळाची व्यवस्था. असे नाही की आपण चिंताग्रस्त होत नाही. ही एक सामान्य प्रक्रिया आहे. ‘
तो म्हणाला,’ परिस्थिती समजून घेतल्यानंतर त्यावर योग्यरित्या मात करणे गरजेचे असते. ऍशेस कसोटी असो अथवा विश्वचषकाचा अंतिम सामना, शेवटी हा क्रिकेटचा खेळ आहे.
आयपीएल मधून मिळते मोठी शिकवण
कोणत्याही परिस्थितीत खेळाडूने कसे तयार रहावे हे शिकण्यासाठी आयपीएल स्पर्धा खूप मदतगार सिद्ध होते. कारण या स्पर्धेत तुम्ही जगातील सर्वोत्तम खेळाडूंसोबत तसेच सर्वोत्तम खेळाडूंविरोधात खेळत असता. आणि त्यांचा खेळ समजून घेण्याची अनमोल संधी येथे तुम्हाला मिळते.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2020: या ५ कारणांमुळे पंजाबचा विजयी रथ रोखण्यात राजस्थानला आले यश
दुष्काळात तेरावा महिना ! हैदराबादचा ‘हा’ स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर
‘हा’ खेळाडू बनू शकतो तिन्ही क्रिकेट प्रकारातील सर्वश्रेष्ठ अष्टपैलू, गंभीरची भविष्यवाणी
ट्रेंडिंग लेख –
सीके नायडूंनी ८८ वर्षांपूर्वी मारला होता ‘तो’ ऐतिहासिक षटकार
…आणि १५ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ खेळीने एमएस धोनी भारतीय चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झाला