---Advertisement---

‘या’ खास कारणासाठी भारताला पराभूत करायचे आहे, बेन स्टोक्सने उघडले गुपित 

On: रविवार, फेब्रुवारी 7, 2021 12:13 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी सामन्यांच्या कसोटी मालिकेला शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडने शानदार खेळ केला. विशेषत: कर्णधार जो रूटने. कारकिर्दीतील शंभरावा कसोटी सामना खेळणाऱ्या रुटने दुहेरी शतक झळकावून हा सामना आणखीनच संस्मरणीय केला. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर इंग्लंड टीमचा अष्टपैलू खेळाडू आणि उपकर्णधार बेन स्टोक्स म्हणाला की त्यांच्या संघाला एका विशिष्ट कारणामुळे हा सामना जिंकण्याची इच्छा आहे.

इग्लंडचा उपकर्णधार बेन स्टोक्स याने जो रूटचे जगातील सर्वोत्तम फलंदाज आणि प्रेरणादायी कर्णधार म्हणून वर्णन केले आहे. त्याच्या म्हणण्यानुसार रूटच्या शंभराव्या कसोटीची खरी भेट म्हणजे भारताविरुद्ध इग्लंडचा पहिल्या कसोटीतील विजय हा होय.

‘संपूर्ण कसोटी सामन्यात फलंदाजाव्यतिरिक्त मी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करण्यात माझे शंभर टक्के योगदान देईन, कारण रूटसाठी कसोटी सामना जिंकणे हे खूप खास असणार आहे,’असे देखील स्टोक्सचे म्हणणे आहे.

बेन स्टोक्स याने रूटचे जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि प्रेरणादायी कर्णधार म्हणून वर्णन करताना त्याची १०० वी कसोटी कॅप प्रदान केली होती. त्यामुळे हा कसोटी सामना कसा जिंकता येईल यासाठी इंग्लंडचा संघ सर्वोत्तपरी प्रयत्न करताना दिसत आहे.

स्टोक्सने एका वृत्तपत्रातील स्तंभात लिहिले आहे की, ‘सामान्यापूर्वी कॅप्टन रूट त्याच्या १०० व्या कसोटी सामन्याची टोपी देणे हे विशेष होते. काही क्षण असे असतात की ते आपल्या कारकिर्दीत आपल्यासोबत नेहमी असतात. तो लोकांसाठी एक उत्तम खेळाडू, जगातील सर्वोत्तम फलंदाज आणि एक प्रेरणादायी कर्णधार आहे. तर काही लोकांच्या मते तो एक क्रिकेटमधील उदार मनाचा आणि नम्रतेने वागणारा माणूस आहे.’

काही वर्षांपूर्वी ब्रिस्टलमध्ये नाईट क्लब बाहेर झालेल्या हाणामारीचे आयुष्यात वाईट प्रकरण आठवताना स्टोक्स म्हणाला, त्यावेळी देखील रूटने त्याला पाठिंबा दर्शविला होता. यापेक्षा दुसरं कोणतंच उत्तम उदाहरण त्याच्यासाठी असू शकत नाही. ‘माझ्या कठीण काळात त्याची मला साथ असणे हेच माझ्यासाठी मोठे होते. त्यावेळी तो माझा कर्णधार नसून फक्त माझा मित्र होता आणि मी नेहमीच त्याचा आदर करतो,’ अशा प्रेरणादायी आणि भावनिक शब्दात स्टोक्स रूटबाबत व्यक्त झाला.

महत्त्वाच्या बातम्या –

टीम इंडियाची सर्वात क्यूट चियरलीडर पाहिली का?, एका तासातच फोटो झालाय भन्नाट व्हायरल

शतक सोडा द्विशतक केलं, तरीही धोनीच्या ‘या’ विक्रमाला धक्काही नाही लावू शकला रुट 

‘दुसऱ्या कोणत्याही क्षेत्राबद्दल बोलताना सावधगिरी बाळग’, शरद पवारांचा सचिन तेंडुलकरला सल्ला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---