आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतेच काही दिवसांपूर्वी २०११ ते २०२० या कालावधीतील सर्वोत्तम वनडे, टी२० आणि कसोटी संघाची घोषणा केली. या संघांमध्ये या दशकात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना स्थान देण्यात आले. इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सचाही आयसीसीने जाहीर केलेल्या दशतकातील सर्वोत्तम वनडे आणि कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी त्याला आयसीसीकडून कॅपही देण्यात आल्या आहेत.
स्टोक्सने आयसीसीने पाठवलेल्या दशकातील सर्वोत्तम वनडे आणि कसोटी संघाच्या कॅप घालून फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात फोटोंच्या कॅप्शनमध्ये त्याने आयसीसीचे आभार मानले. याबरोबरच त्याने आयसीसीच्या दशकातील सर्वोत्तम कसोटी संघाच्या कॅपबाबत गमतीने तक्रारही केली. त्याने म्हटले की ‘ही कॅप थोडीशी बॅगी आणि हिरवी (ग्रीन) आहे.’ थोडक्यात त्याला म्हणायचे होते की ही कॅप ऑस्ट्रेलिया संघाच्या ‘बॅगी ग्रीन’ कॅप सारखी आहे.
https://www.instagram.com/p/CJbeItgrenU/
स्टोक्सच्या या गमतीशीर तक्रारीबद्दल आयसीसीनेही गमतीने स्टोक्सची माफी मागितली आहे. त्यांनी म्हटले आहे की ‘सॉरी बेन स्टोक्स’.
Sorry @BenStokes38! 😂 pic.twitter.com/Z7KIuXsCsE
— ICC (@ICC) December 31, 2020
बेन स्टोक्स गेल्या काही वर्षात एक सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून समोर आला आहे. त्याने त्याच्या कामगिरीच्या जोरावर इंग्लंडला २०१९ चा विश्वचषक जिंकून दिला. एवढेच नाही तर त्याने २०१९ च्या ऍशेस मालिकेतही शानदार कामगिरी केली.
बेन स्टोक्सने त्याच्या कारकिर्दीत ६७ कसोटी सामने खेळताना ४४२८ धावा आणि १५८ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने वनडेत ९५ सामने खेळताना २६८२ धावा केल्या असून ७० विकेट्स घेतल्या आहेत.
आयसीसीच्या संघात या इंग्लंड खेळाडूंचाही समावेश –
स्टोक्सशिवाय आयसीसीने जाहीर केलेल्या दशकातील सर्वोत्तम कसोटी संघात ऍलिस्टर कूक, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन या इंग्लंडच्या खेळाडूंचाही समावेश आहे. तसेच वनडे संघात स्थान मिळवणारा स्टोक्स इंग्लंडचा एकमेव खेळाडू आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
साल २०२० मध्ये कसोटीत शतक करणारा ‘हा’ आहे एकमात्र भारतीय खेळाडू
धोनीचा दशकातील सर्वोत्तम टी२० संघात समावेश कसा ? ‘या’ भारतीय क्रिकेटरने उपस्थित केला प्रश्न
क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणी! २०२१ मध्ये टीम इंडिया खेळणार ‘एवढ्या’ मालिका