---Advertisement---

विक्रमी 182 धावांच्या खेळीनंतर स्टोक्सने आपल्याच सहकाऱ्याची मागितली माफी, पण का?

On: गुरूवार, सप्टेंबर 14, 2023 8:25 PM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघातही 4 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या 4 सामन्यांच्या मालिकेची सुरुवात इंग्लंडच्या पराभवासोबत झाली. मात्र, त्यानंतर इंग्लंडने पुढील दोन सामने जिंकत मालिकेत दमदार पुनरागमन केले. बुधवारी (दि. 13 सप्टेंबर) झालेल्या सामन्यात इंग्लंडचा 181 धावांनी विजय झाला. या विजयाचा शिल्पकार बेन स्टोक्स ठरला. मात्र, आपल्या या खेळीनंतर त्याने इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय याची माफी मागितल्याची कबुली दिली.

याच मालिकेतून वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन केलेल्या स्टोक्सने पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर त्याने या सामन्यात 124 चेंडूत सर्वाधिक 182 धावांची खेळी साकारली. त्याच्या या खेळीत 9 षटकार आणि 15 चौकारांचा समावेश होता. इंग्लंड साठी वन डे क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. त्याने जेसन रॉय याचा 180 धावांचा विक्रम मोडीत काढला. रॉय याने 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही खेळी केली होती.

आपल्या या खेळीनंतर बोलताना स्टोक्स याने सांगितले की,

“मी जेसन रॉय याचा विक्रम मोडल्याची माहिती मला मिळाली. त्यानंतर मी त्याला सॉरी म्हटले आहे.”

या सामन्यात इंग्लंडने स्टोक्सच्या शानदार खेळीच्या जोरावर 48.1 षटकात सर्वबाद 368 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघ 39 षटकात 187 धावांवरच सर्वबाद झाला. त्यामुळे त्यांना 181 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. स्टोक्सला या खेळीसाठी सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. मालिकेतील अखेरचा सामना 15 सप्टेंबर रोजी खेळला जाईल. पुढील महिन्यात सुरू होत असलेल्या वनडे विश्वचषकाचा पहिला सामना देखील याच संघां दरम्यान खेळला जाणार आहे.

(Ben Stokes Say Sorry To Jason Roy After His 182 Runs Inning)

हेही वाचा-
कॅलिसने निवडले वर्ल्डकपसाठी टॉप फाईव्ह खेळाडू! ‘ते’ एक नाव चकित करणारे
खुशखबर! श्रेयस पुन्हा उतरला मैदानात, बांगलादेशविरुद्ध खेळणार ‘या’ क्रमांकावर? 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---