---Advertisement---

बेन स्टोक्सची सर्वोत्तम वनडे खेळी! कमबॅकनंतर तिसऱ्याच सामन्यात करणार होता द्विशतक

On: बुधवार, सप्टेंबर 13, 2023 8:34 PM
Ben Stokes 100
---Advertisement---

इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स याने नुकतेच वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. पुमरागमनानंतर तिसऱ्याच वनडे सामन्यात बुधवारी (13 सप्टेंबर) स्टोक्सने शतक ठोकले. न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात इंग्लंड संघाची सुरुवात निराशाजनक झाली होती. पण स्टोक्स आणि डेविड मलान यांनी संघाला भक्कम स्थितीत पोहोचवले. अवघ्या काही धावा कमी पडल्यामुळे स्टोक्सला कारकिर्दीतील पहिले वनडे द्विशतक करता आले नाही. 

इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) यांच्यातील हा तिसरा वनडे सामना होता. चार सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंड, तर दुसरा सामना इंग्लंडने जिंकला. बुधवारी तिसऱ्या वनडेत इंग्लनडे नाणेफेक गमावल्यानंतर इंग्लंडला प्रथम फलंदाजी करावी लागली. ट्रेंट बोल्ड याला आगामी वनडे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंड संघात सामील केले गेले आहे. त्याने इंग्लंडच्या पहिल्या दोन विकेट्स संघाची धावसंख्या अवघी 13 असताना घेतल्या. सलामीवीर जॉनी बेअरस्टो आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेला जो रुट अनुक्रमे 0 आणि 4 धावा करून बाद झाले.

पण त्यानंतर चौथ्या क्रमांकावर आलेल्या बेन स्टोक्स (Ben Stokes) याने अवघ्या 76 चेंडूत आवले शतक पूर्ण केले. यात 11 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. स्टोक्सचा फॉर्म पाहून चाहते चांगलेच खुश आहेत. स्टोक्सप्रमाणेच सलामीवीर डेविड मलान शतक करेल, असे सर्वांनाच वाटत होते. मात्र मलान वैयक्ति 96 धावा करून ट्रेंट बोल्टच्या चेंडूवर यष्टीरक्षक टॉम लॅथमच्या हातात झेलबाद झाला. स्टोक्सने या डावात 124 चेंडूत 182 धावांची सर्वोत्तम खेळी केली. यात 15 चौकार आणि 9 षटकारांचा समावेश होता. अवघ्या 18 धावा कमी पडल्यामुळे त्याचे पहिले वनडे द्विशतक हुकले. (Ben Stokes scored 100 against nz)

https://x.com/englandcricket/status/1701968246704943519?s=20

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन – 
इंग्लंड: डेविड मलान, जॉनी बेअरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार आणि यष्टीरक्षक), मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, रीस टोपले.

न्यूझीलंड: विल यंग, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (सी, विकेट), ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, काइल जेमिसन, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट, बेन लिस्टर.

महत्वाच्या बातम्या – 
रोहित-विराटच्या वयाचा मुद्दा निघताच इंग्लिश दिग्गजाने दिले अँडरसनकचे उदाहरण, म्हणाला…
धोनीला आख्ख्या करिअरमध्ये न जमलेला ‘हा’ विक्रम विराटने दाखवला करून, यादीतला टॉपर ‘मास्टर ब्लास्टर’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---