---Advertisement---

दुखापतीमुळे गेले २ महिने क्रिकेटपासून दूर असलेला बेन स्टोक्स ‘या’ स्पर्धेतून करणार मैदानात पुनरागमन

On: बुधवार, जून 9, 2021 12:20 PM
Ben Stokes
---Advertisement---

इंग्लंड संघाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स पुढील आठवड्यात टी20 ब्लास्टमध्ये डरहमकडून खेळणार आहे. दुखापतीच्या कारणाने स्टोक्स सध्या न्यूझीलंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतून बाहेर आहे

क्रिकइंफोच्या वृत्तानुसार इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने स्टोक्सच्या पूनरागमची माहिती दिलेली नाही. परंतु, त्याचे लक्ष लंकाशायर विरुद्ध 14 जूनला होणाऱ्या दुसऱ्या इलेव्हन टी20 सामन्यात पुनरागमन करणे आहे. टी20 ब्लास्टमध्ये डरहम संघाला आणखी चार सामने खेळायचे आहेत. स्टोक्स त्या सामन्यांमध्ये आपली हजेरी लावू शकतो.

बेन स्टोक्स टी20 ब्लास्टमध्ये तीन वर्षांतून पहिल्यांदा सामना खेळणार आहे. आयपीएल 2021च्या सुरुवातीलाच दुखपतीच्या कारणामुळे स्टोक्सला राजस्थान रॉयल्स संघातून बाहेर पडावे लागले होते. त्यानंतर त्याच्या बोटावर शस्त्रक्रिया झाली आहे. याच दुखापतीमुळे तो न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून बाहेर आहे. पण आता तो या दुखापतीतून सावरला असून मैदानावर पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. स्टोक्सने काही दिवसांपूर्वी सांगितले की, त्याच्या बोटावर शस्त्रक्रिया झाली होती, ती जखम आता पूर्णपणे बरी झाली आहे.

बेन स्टोक्सची कामगिरी
बेन स्टोक्स हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आणि कसोटी क्रिकेटमधील इंग्लंड क्रिकेट संघाचा उप-कर्णधार आहे. स्टोक्स हा इंग्लंड संघाचा भाग होता ज्याने 2019 क्रिकेट विश्वचषक जिंकला. या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सामनावीराचा पुरस्कार स्टोक्सने जिंकला होता.

स्टोक्सने आत्तापर्यंत 71 कसोटी सामने खेळले असून 10 शतके आणि 24 अर्धशतकांसह 4631 धावा केल्या आहेत आणि 163 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर 98 वनडे सामन्यात 3 शतकांसह 2817 धावा केल्या आहेत आणि 74 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने 34 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून 442 धावा केल्या आहेत आणि 19 विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

WTC च्या अंतिम सामन्यात कोण करणार सर्वाधिक धावा? पाहा काय म्हणाला दिग्गज क्रिकेटपटू

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित झालेल्या रॉबिन्सनला इंग्लंड संघाचा पाठिंबा; अँडरसन म्हणाला, ‘संघ म्हणून आम्ही…’

WTC Final: न्यूझीलंडच्या ‘या’ गोलंदाजापासून पुजाराला आहे धोका; आत्तापर्यंत ४ वेळा केलंय बाद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---