गेल्या कित्येक दिवसांपासून ऍशेस मालिकेची आतुरतेने वाट पाहिली जात होती. या मालिकेला बुधवारपासून (८ डिसेंबर) प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिला सामना गाबाच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सचे पुनरागमन झाल्याचे पहायला मिळाले आहे. परंतु, हा सामना सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला त्याने एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये तो भावूक झाल्याचे पाहायला मिळाले होते.
बेन स्टोक्सने हा सामना सुरू होण्याच्या पूर्व संध्येला आपल्या दिवंगत वडिलांची आठवण करत एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये त्याने लिहिले होते की, “काही महिन्यांपूर्वी मी मैदानात पुनरागमन करेन, असे कधीच वाटले नव्हते. उद्या (८ डिसेंबर) जेव्हा मी मैदानात उतरेन त्यावेळी ते माझ्यासाठी आश्चर्यकारक असेन. तुम्ही सोडून मला बरोबर एक वर्ष होणार आहे, मी तुमची आठवण काढत असेल. हा पूर्ण आठवडा तुम्ही माझ्यासोबत असाल.”
बेन स्टोक्सचे वडील गेड स्टोक्स यांचे ऍशेस कसोटी मालिका २०२१ -२२ सुरू होण्याच्या ठीक एक वर्षांपूर्वी निधन झाले होते. दीर्घ काळ कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर अखेर ६५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता.
बेन स्टोक्सने ६ महिने क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्याने गेल्या महिन्यापासून क्वीन्सलँडच्या गोल्ड कोस्टमधील मेट्रिको स्टेडियममध्ये इंग्लंड संघासोबत सराव करायला सुरुवात केली होती. बेन स्टोक्सने मानसिक आरोग्याच्या समस्या आणि बोटाच्या दुखापतीतून सावरण्यासाठी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. आता ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातून तो पुनरागमन करत आहे.
https://www.instagram.com/p/CXLsuy4sEYu/?utm_medium=copy_link
Who will be our leading wicket taker in the Men's Ashes? #Ashes pic.twitter.com/SvtZYIYb1I
— England Cricket (@englandcricket) December 7, 2021
ब्रिस्बेन कसोटी सामन्यासाठी असा आहे इंग्लंडचा ११ सदस्यीय खेळाडूंचा संघ : जो रूट (कर्णधार), रॉरी बर्न्स, जोस बटलर (यष्टिरक्षक), हसीब हमीद, डेव्हिड मलान, जॅक लीच, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स, मार्क वुड .
महत्वाच्या बातम्या :
न्यूझीलंडला धक्का! केन विलियम्सन ‘इतक्या’ दिवस राहणार क्रिकेटपासून दूर
ऐतिहासिक वनडे द्विशतकाला १० वर्षे पूर्ण; आजच्याच दिवशी सेहवागने काढली होती विंडीज गोलंदाजांची पिसं
“आम्हाला आयपीएलचे आजोबा म्हणून हिणवले गेलेले, पण आम्ही…”; सीएसकेच्या खेळाडूने बोलून दाखवले शल्य