भारताचा माजी स्फोटक सलामीवीर विरेंद्र सेहवागने दहा वर्षापूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे ८ डिसेंबर २०११ साली आपल्या वनडे कारकीर्दीतील पहिले द्विशतक ठोकले होते. त्याचबरोबर वनडेत द्विशतक ठोकणारा क्रिकेट इतिहासातील सेहवाग दुसरा खेळाडू ठरला होता.
विरेंद्र सेहवागने ही कामगिरी वेस्ट इंडिज संघाविरुद्धच्या वनडे सामन्यात केली होती. हा सामना इंदौर येथील होळकर स्टेडियममध्ये खेळला गेला होता. आपल्या या शानदार खेळीत त्याने 41 चौकार आणि 7 षट्कार ठोकले होते आणि 219 धावा केल्या होत्या.
सचिन तेंडुलकरने झळकविले होते पहिले द्विशतक
सेहवागच्या अगोदर वनडे सामन्यात द्विशतक मारण्याचा पराक्रम एका भारतीय खेळाडूनेच केला होता. २००८ साली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पहिल्यांदा द्विशतक लगावले होते. ग्व्लाल्हेरच्या मैदानात दक्षिण आफ्रिकन संघाविरुद्ध खेळताना सचिनने ही कामगिरी केली होती.
त्यानंतर विरेंद्र सेहवागने २०११ साली विंडीजविरुद्ध अशी कामगिरी केली. त्याच्यानंतर रोहित शर्माने वनडे सामन्यांत एकदा नव्हे तर तब्बल तीन वेळा द्विशतक झळकाविले आहे.
https://twitter.com/ICC/status/1203510917645795328
बेधडक फलंदाजीसाठी सेहवाग होता प्रसिद्ध
मूळ दिल्लीचा असणारा सेहवाग आपल्या बेधडक फलंदाजीसाठी प्रसिद्ध होता. कुठलेही गोलंदाज समोर असले, तरी सेहवाग कायमच आक्रमक फलंदाजी करण्यालाच प्राधान्य देत असे. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २५१ वनडे सामन्यांत त्याने ३५ च्या सरासरीने ८२७३ धावा केल्या आहेत. ज्यात ३८ अर्धशतके आणि १५ शतकांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे १०४ कसोटी सामन्यांत ४९.३४ च्या सरासरीने ८५८६ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
अन् इंग्लंड-ऑस्ट्रेलिया संघातील ऐतिहासिक ऍशेस मालिकेचा जन्म झाला
न्यूझीलंडला धक्का! केन विलियम्सन ‘इतक्या’ दिवस राहणार क्रिकेटपासून दूर
ऑस्ट्रेलिया-इंग्लंड संघात रंगणार ७२ वी ऍशेस मालिका; कुठे, कधी पाहू शकाल पहिला सामना, जाणून घ्या






