जागतिक क्रिकेटमधील अव्वल दर्जाचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्स आयपीएल २०२० साठी रविवारी (४ ऑक्टोबर) युएईला परतला आहे. आयपीएलमध्ये कोव्हिड-१९ प्रोटोकॉलनुसार तो ६ दिवस क्वारंटाईन राहिल्यानंतर आपल्या राजस्थान रॉयल्स संघात दिसेल.
इंग्लंडचा क्रिकेटपटू स्टोक्सच्या वडिलांना कॅन्सर झाला होता. त्यामुळे त्याने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतून आणि आयपीएलमधून माघार घेतली होती आणि कॅन्सरने ग्रस्त असलेल्या आपल्या वडिलांची काळजी घेण्यासाठी तो न्यूझीलंडला गेला होता. पण हाच खेळाडू आता क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्सासाठी सज्ज झाला आहे. यासाठी त्याच्या वडिलांनी त्याला प्रेरित केले होते.
मुंबई मिररशी बोलताना स्टोक्स म्हणाला की, “न्यूझीलंडवरुन युएईला पोहोचल्यानंतर हॉटेलच्या एका खोलीत स्वत:ला पुन्हा क्वारंटाईन करतेवेळी मी विचार केला नव्हता की, आयपीएलमध्ये माझे परत येणे असे असेल. पण इतर सर्व गोष्टींचा विचार करता मी एकदम बरोबर ठिकाणी आलो आहे.”
“क्राइस्टचर्चमध्ये माझे वडील, आई आणि भाऊ यांना सोडून इकडे येणे हा माझ्यासाठी खूप कठीण निर्णय होता. एक कुटुंब म्हणून आमच्यासाठी गेल्या काही महिन्यांचा कालावधी खूप कठोर राहिला आहे. पण आम्ही सर्वजण एकजुटीने आमच्यावर आलेल्या कठीण परिस्थितीचा सामना करण्याचा प्रयत्न आहोत,” असे पुढे बोलताना स्टोक्स म्हणाला.
“माझे आई-वडील माझ्या जबाबदारींविषयी खूप शिस्तबद्ध आहेत. त्यांनी मला म्हटले की, माझे जे काम आहे ते करणे माझी जबाबदारी आहे. आम्ही या विषयावर खूप चर्चा केली आणि त्यानंतर मी युएईला येण्याचा निर्णय घेतला,” असे स्टोक्सने सांगितले.
६ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर स्टोक्स ११ ऑक्टोबरला सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसेल.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2020 : तब्बल ५ वर्ष आणि ६९ सामन्यांनंतर कोलकाता संघाने मोडली त्यांची परंपरा
‘अरे गेल्या ७३ वर्षात तुम्ही ‘ही’ साधी गोष्ट शिकला नाहीत का?’ गावसकरांचा ऑस्ट्रेलियन खेळाडूंना टोला
ट्रेंडिंग लेख-
थेट तामिळ चित्रपटात काम करुन सर्वांनाच सुखद धक्का देणारा बड्डे बॉय ब्राव्हो
IPL 2020: चेन्नई विरुद्ध कोलकाता सामन्यात होऊ शकतात ‘हे’ ५ खास विक्रम
भारताची मुलुखमैदान तोफ! धोनीही ज्याचे गुणगाण करत ‘तो’ आज मुंबईसाठी करतोय जीवाचे रान






