इंग्लंडच्या 2019 विश्वचषक विजयाचा हिरो बेन स्टोक्सला काही दिवसांपूर्वी ‘न्यूझीलंडर्स ऑफ द ईयर’ पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले होते. पण त्याने एक प्रसिद्धीपत्रक जाहिर करत या नामांकन यादीतून त्याचे नाव मागे घेतले आहे. त्याने तो या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी योग्य नसल्याचे म्हटले आहे.
तसेच त्याने त्याच्याबरोबरच या पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलेला न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन जोरदार पाठिंबा दिला आहे आणि विलियम्सन पुरस्कारासाठी योग्य असल्याचे म्हटले आहे.
स्टोक्स इंग्लंडकडून खेळला असला तरी त्याचा जन्म 4 जून 1991 ला न्यूझीलंडमध्येच झाला आहे. तो वयाच्या 12 व्या वर्षापर्यंत ख्राईस्टचर्च, न्यूझीलंड येथे राहत होता. त्यानंतर तो कुंटुंबासह इंग्लंडला वास्तव्यास गेला. तिथेच त्याने क्रिकेटचे धडे गिरवले. पण 2013 नंतर त्याचे आई-वडील पुन्हा ख्राईस्टचर्चला येऊन स्थायिक झाले. तर स्टोक्स इंग्लंडमध्येच थांबला.
स्टोक्सने नाट्यपूर्ण झालेल्या 2019 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंकडून नाबाद 84 धावा केल्या होत्या. तसेच त्याने सुपर ओव्हरमध्येही 8 धावा केल्या होत्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही देण्यात आला होता.
या सामन्यात सुपर ओव्हरही बरोबरीत सुटल्यानंतर बाऊंड्रीच्या फरकांमुळे इंग्लंडला विश्वविजेता घोषित करण्यात आले होते. या सामन्याबरोबर या संपूर्ण विश्वचषकात स्टोक्सने केलेली शानदार कामगिरी पाहता आणि त्याचा जन्म न्यूझीलंडचा असल्याने त्याला ‘न्यूझीलंडर्स ऑफ द ईयर’ पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले होते.
परंतू त्याने या पुरस्कारातून त्याचे नाव मागे घेताना म्हटले आहे की ‘माझे ‘न्यूझीलंडर्स ऑफ द ईयर’ पुरस्कारासाठी नामांकन झाल्याने मला खूप आनंद झाला. मला माझ्या न्यूझीलंड आणि माओरी संस्कृतीचा अभिमान आहे. पण मी या प्रतिष्ठित पुरस्काराचे नामांकन मिळवण्यासाठी योग्य व्यक्ती नाही.’
‘तिथे अनेक लोक आहेत जे या सन्मानासाठी पात्र आहेत आणि त्यांनी न्यूझीलंडसाठी खूप काही केले आहे.’
‘मी इंग्लंडला विश्वचषक जिंकण्यात मदत केली आहे आणि माझे आयुष्य युके (युरोप) मध्ये स्थापित झाले आहे. मी इथे वयाच्या 12 व्या वर्षापासून आहे.’
स्टोक्सने पुढे या पुरस्कारासाठी विलियम्सनला पाठिंबा देताना म्हटले आहे की ‘मला वाटते संपूर्ण देशाने न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनला समर्थन दिले पाहिजे. त्याचा न्यूझीलंडचा दिग्गज म्हणून आदर केला जावा. त्याने त्याच्या संघाचे विश्वचषकात प्रतिष्ठेने आणि सन्मानाने नेतृत्व केले.’
‘तो विश्वचषकाचा मालिकावीर आहे आणि तो प्रेरणादायी नेतृत्व आहे. त्याने प्रत्येक परिस्थितीत नम्रता आणि सहानुभुती दाखवली आहे. तो एक अष्टपैलू व्यक्तीमत्त्व आहे. एक न्यूझीलंडर असणे काय आहे, हे त्याने दाखवले आहे. तो या सन्मानासाठी एक योग्य व्यक्ती आहे. न्यूझीलंडचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे. तो यासाठी पात्र आहे आणि माझे मतही त्यालाच आहे.’
https://twitter.com/benstokes38/status/1153582421205557253
"He shows humility and empathy to every situation and is an all-round good bloke. He deserves it and gets my vote" – Ben Stokes bats for Kane Williamson in New Zealander of the Year award 👏#SpiritOfCricket pic.twitter.com/YglFuuL33O
— ICC (@ICC) July 23, 2019
https://www.instagram.com/p/B0QKcAQgELa/
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–वनडे, टी२० नंतर आता कसोटीमध्येही क्रमांक आणि नाव असलेली जर्सी घालणार इंग्लंडचे खेळाडू
–भारताविरुद्धच्या पहिल्या दोन टी२०सामन्यांसाठी असा आहे विंडीजचा संघ; या दोन खेळाडूंचे झाले पुनरागमन
–या सामन्यानंतर लसिथ मलिंगा घेणार वनडेतून निवृत्ती