भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर शुक्रवार रोजी (२६ मार्च) रोजी दुसरा वनडे सामना पार पडला. हा सामना पाहुण्या संघाने ६ विकेट्सने खिशात घातला. यासह वनडे मालिका १-१ ने बरोबरीवर आली आहे. दरम्यान इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज बेन स्टोक्स याच्याबद्दल पंचांनी दिलेला एक निर्णय वादग्रस्त ठरला आहे. सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे.
त्याचे झाले असे की, भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात ६ बाद ३३६ धावांचा डोंगर उभा केला. या धावांचा पाठलाग करताना २५ व्या षटकापर्यंत इंग्लंड १ बाद १६७ धावा अशा स्थितीत होता. त्यापुढील षटक टाकण्यासाठी भारताचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार आला.
भुवनेश्वरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर स्टोक्सने मिड विकेटच्या दिशेने साधारन शॉट मारला आणि तो २ धावा घेण्यासाठी पळाला. पहिली धाव यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर तो दुसरी धाव पूर्ण करत होता. इतक्यात कुलदीप यादवने चेंडू अडवला आणि थेट यष्टीवर थ्रो केला. त्याचा थ्रो अचूक यष्टीला लागला आणि बेल्स उडून बाजूला पडल्या. तोवर स्टोक्सदेखील क्रिजवरील सीमारेषेपर्यंत पोहोचला होता.
यामुळे मैदानी पंच पेचात पडले. त्यानंतर तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेल्यानंतर त्यांनाही स्टोक्स बाद आहे का नाबादय़ हे अचूक सांगता आले नाही. अखेर स्टोक्स नाबाद असल्याचे घोषित केले गेले.
मात्र पंचांचा हा निर्णय सामना दर्शकांपासून ते आजी-माजी क्रिकेटपटूंनाही खटकला. त्यानंतर ट्विटरवर या विकेटचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अनेकांनी पंचांच्या निर्णायस सहमती दर्शवली आहे. तर अनेकांनी त्यांचा विरोध केला आहे.
https://twitter.com/vprashant4/status/1375455367694479360?s=20
Clearly nothing behind the line! Still not sure how was that given NOT OUT.Ridiculous Umpiring.#INDvENG pic.twitter.com/WPpNTcPsJi
— Joel 💭 (@joelwazza10) March 26, 2021
Benefit of the doubt went with the batsman, Ben Stokes is not out. pic.twitter.com/lO0pQyvypb
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 26, 2021
इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू मायकल वॉन यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी जर असतो तर बाद दिले असते, असे त्यांनी म्हटले आहे.
Wow … I would have given that Out … #INDvENG
— Michael Vaughan (@MichaelVaughan) March 26, 2021
माजी भारतीय अष्टपैलू युवराज सिंग यानेही बेन स्टोक्स बाद असल्याचे सांगितले आहे.
That was out !!! No part of bat was touching over the line . It was just showing that it was over ! Just my opinion !! #IndiavsEngland
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) March 26, 2021
३३ धावांवर पहिले जीवनदान मिळाल्यानंतर स्टोक्सने भारतीय गोलंदाजांना चांगलेच चोपले. ५२ चेंडूत १० षटकार आणि ४ चौकार मारत ९९ धावा केल्या. शेवटी भुवनेश्वरनेच रिषभ पंतच्या हातून ३५.२ षटकात त्याला झेलबाद केले.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताची चिंता वाढवणारी बातमी! ‘हा’ खेळाडू टी२० वर्ल्डकपमधून बाहेर होण्याची शक्यता