---Advertisement---

‘आता आयपीएल तेव्हाच खेळेल, जेव्हा…’; बेन स्टोक्सने केले महत्वाचे विधान

On: मंगळवार, ऑगस्ट 23, 2022 4:36 PM
---Advertisement---

इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने काही दिवसांपूर्वी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर त्याच्यावर अनेक सवाल उपस्थित करण्यात आले. क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आपण निवृत्ती घेत असल्याचे स्टोक्सने सांगितले होते. त्यानंतर तो आयपीएल खेळणार की नाही यावर आता त्याने स्पष्टीकरण दिले आहे.

“आता कर्णधार असल्याने माझ्यावरही ती जबाबदारी आहे. कोणत्याही विदेशी लीगसाठी माझी बांधिलकी आमच्या वेळापत्रकावर आधारित असेल. मी ४ वर्षे आयपीएल खेळलो आहे. प्रत्येक वेळी मला खूप प्रेम मिळाले आहे. जगातील काही सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि काही सर्वोत्तम प्रशिक्षकांसोबत काम करण्याच्या संधीचा एक भाग बनणे ही एक आश्चर्यकारक स्पर्धा आहे. यात सहभागी होणे हा एक अद्भुत अनुभव आहे.” असं म्हणत स्टोक्सने आयपीएलमधील उपलब्धतेवर भाष्य केलं आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
काय गोलंदाजी केलीस भावा? सगळेच फलंदाज शून्यावर बाद, १५ चेंडूत पालटला सामना
लवकरच चाहत्यांना मैदानात होणार बुमराहचे दर्शन! पोस्ट शेअर करत दिली इन्जूरी अपडेट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---