इंग्लंड क्रिकेट संघाचा दिग्गज बेन स्टोक्स याने मागच्या वर्षभरात जबरदस्त प्रदर्शन केले. स्टोक्स मागच्या वर्षी इंग्लिश कसोटी संघाचे कर्णधारपद सांभाळले आणि संघाच्या प्रदर्शनात मोठी सुधारणा पाहायला मिळाली. स्टोक्सचे वैयक्तिक प्रदर्शन यादरम्यानच्या काळात उत्कृष्ट होते. 2022 मध्ये स्टोक्स फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांमध्ये चांगले प्रदर्शन करताना दिसला. या प्रदर्शनाच्या जोरावर आयसीसीसने त्याला टेस्ट प्लेअर ऑफ द ईयर निवडले गेले.
Leading from the front 🌟
England's inspirational captain is the recipient of the ICC Men's Test Cricketer of the Year 2022 Award 🏅#ICCAwards
— ICC (@ICC) January 26, 2023
बेन स्टोक्स (Ben Stokes) मागच्या वर्षी (2022) चाहत्याच्या अपेक्षांवर खरा उतरला. जो रुट (Joe Root) याने इंग्लंड कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर स्टोक्स संघाचा कर्णधार बनला. मागच्या वर्षभरात त्याने 15 कसोटी सामने खेळले आणि यात 36.25 च्या सरासरीने 870 धावा केल्या. यादरम्यानच्या कालात त्याने गोलंदाजी विभागासाठी एकूण 27 विकेट्स देखील घेतल्या. अशाप्रकारची उत्कृष्ट आकडेवारी आणि नेतृत्वगुण याच्या जोरावर स्टोक्स आयसीसी प्लेअर ऑफ द ईयर (ICC Men’s Test Cricketer of the Year) बनला.
स्टोक्सने मागच्या वर्षभरात इंग्लिश संघासाठी चमकदान कामगिरी केली. त्याची आकडेवारी उत्कृष्ट होतीच, पण संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम (Brandon McCullum) यांच्यासोबत त्याचे प्रदर्शन अधिकच सुधारले. संघाला नवे प्रशिक्षक आणि नवीन कर्णधार मिळाल्यानंतर इंग्लंड कसोटी संगाची खेळण्याची पद्धत पूर्णपणे बदलली. संघातील खेळाडू या नवीन प्रशिक्षक आणि कर्णधाराच्या नेतृत्वात अगदीच आक्रमक खेळी करू लागला आणि याचा फायदा देखील दिसून आला. स्टोक्सच्या नेतृत्वात इंग्लंडने खेळलेल्या 10 कसोटी सामन्यांपैकी 9 सामन्यांमध्ये त्यांना यश मिळाले.
यादरम्यान इंग्लंडने न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका संघाला या संघांना मायदेशात मात दिली. तर भारताविरुद्ध खेळलेल्या एका कसोटी सामन्यात देखील विजय मिळवला. 2021 मध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर आलेला आणि यावेळी कसोटी मालिकेतील शेवटचा सामना काही कारणास्तव रद्द झाला होता. मागच्या वर्षी हा कसोटी सामना खेळला गेला आणि इंग्लंडने विजय मिळवत कसोटी मालिकेत बरोबरी साधली. त्याव्यतिरिक्त मागच्या वर्षी पाकिस्तान संघ देखील इंग्लंडकडून पराभूत झाला. या सर्व मालिकांमध्ये स्टोक्स संघाचा कर्णधार होता. (Ben Stokes won the ICC Test Player of the Year award)
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
केवळ 7 वनडे खेळलेला पाकिस्तानी क्रिकेटपटू म्हणतोय, “आकडेवारीत विराट माझ्यानंतरच”
‘पूर्ण श्रेय विराटला…’, नंबर एकचा वनडे गोलंदाज बनल्यानंतर सिराजचा जुना व्हिडिओ व्हायरल