---Advertisement---

राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, बेन स्टोक्स आयपीएल २०२१ मधून बाहेर

On: मंगळवार, एप्रिल 13, 2021 10:02 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला ९ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. मात्र या हंगामातील पहिल्याच आठवड्यात राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला असल्याचे समजत आहे. राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्स या उर्वरित आयपीएल हंगामातून बाहेर पडला आहे. राजस्थान रॉयल्सने सोशल मीडियाद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे.

सोमवारी राजस्थान रॉयल्सकडून पंजाब किंग्स विरुद्ध खेळताना त्याला ख्रिस गेलचा झेल घेताना दुखापत झाली. या दुखापतीमुळेच त्याला उर्वरित हंगामाला मुकावे लागणार आहे.

गेलचा झेल घेताना दुखापत

सोमवारी झालेल्या सामन्यात पंजाब संघ प्रथम फलंदाजी करत होता. त्यांच्या डावातील १० व्या षटकात युवा रियान परागच्या गोलंदाजीवर गेलने मोठा फटका मारला. त्यावेळी तो चेंडू झेलण्यासाठी लाँग-ऑनला क्षेत्ररक्षण करत असलेला बेन स्टोक्स धावत आला आणि त्याने पुढे झेपावत हा झेल घेतला. मात्र, त्याचवेळी त्याच्या डाव्या हाताला दुखपत झाली.

असे असतानाही तो नंतर राजस्थानकडून सलामीला फलंदाजीला आला होता. पण त्याला मोहम्मद शमीने शुन्यावर बाद केले. स्टोक्सने या सामन्यात गोलंदाजी करताना एकच षटक टाकले होते. मात्र, त्याची दुखापत गंभीर असल्याने त्याला हंगामातून बाहेर पडावे लागले आहे.

स्टोक्सची कामगिरी

गेल्या २ हंगामापासून स्टोक्सची आयपीएलमध्ये खास कामगिरी राहिलेली नाही. मागील हंगामात ८ सामन्यांत एका शतकासह २८५ धावा केल्या होत्या. तसेच २ विकेट्स घेतल्या होत्या. पण यंदा राजस्थानला त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. कारण यापूर्वीच राजस्थानला जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे उपलब्ध नसल्याने मोठा झटका बसला आहे. त्यातच आता जर स्टोक्सही आयपीएलमधून बाहेर पडल्याचा धक्का त्यांना सहन करावा लागणार आहे.

स्टोक्सने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत ४३ सामन्यांत ९२० धावा केल्या आहेत. यात त्याच्या २ शतकांचा आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने २८ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

दुखापतींपासून वाचण्यासाठी ‘हिटमॅन’ करतोय ‘हे’ काम, स्वत:च केला खुलासा

Video: मुंबई विरुद्धच्या सामन्यापूर्वी ब्रेंडन मॅक्यूलमने शाकिब अल हसनला दिली खास कॅप, ‘हे’ आहे कारण

तीन कारण की ज्यामुळे चेतन सकारिया बनू शकतो भारतीय संघांचे भविष्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---