---Advertisement---

फलंदाजासहित प्रेक्षकही हादरले, गोलंदाजाने केले असे काही धावबाद…

On: शुक्रवार, मार्च 13, 2020 7:32 PM
---Advertisement---

आज (13 मार्च) राजकोट येथे पार पडलेल्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात सौराष्ट्रने बंगालवर पहिल्या डावाची आघाडी घेत विजेतेपद जिंकले. सौराष्ट्रने रणजी कारकिर्दीत पहिल्यादांच विजयाचा मान मिळवला आहे.

या अंतिम सामन्यादरम्यान एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले. सौराष्ट्र संघाचा कर्णधार जयदेव उनादकटने (Jaydev Unadkat) बंगालचा फलंदाज आकाशदीपला (Akash Deep) अनोख्या पद्धतीने धावबाद केले.

झाले असे की, उनादकट गोलंदाजी करत असताना आकाशदीपने चेंडू मारला आणि तो क्रीजच्या बाहेर उभा राहिला. याचा फायदा घेत सौराष्ट्रचा यष्टीरक्षक अवि बारोटने (Avi Barot) त्याला धावबाद करण्यासाठी चेंडू स्टंपवर मारला. मात्र, त्याचा चेंडू स्टंपला लागला नाही.

त्यामुळे लगेच उनादकटने चेंडू पकडून स्टंपवरती मारला आणि आकाशदीपला बाद केले. अशा पद्धतीने 2 प्रयत्नानंतर अनोख्या अंदाजात आकाशदीपला धावबाद करण्यात आले. जे पाहून तो स्वत: चकित झाला होता. 

प्रथम फलंदाजी करताना सौराष्ट्रने पहिल्या डावात सर्वबाद 425 धावा करत बंगालला 426 धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करत बंगालला पहिल्या डावात सर्वबाद 381 धावाच करता आल्या. त्यामुळे सौराष्ट्रने रणजी ट्राॅफीचे विजेतेपद पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर जिंकले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---