आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगने भारतातल्याच नाही तर जगभरातल्या क्रिकेट रसिकांना मागील १० वर्षात वेड लावले आहे. आयपीएलनंतर जगभरातील देशात वेगळ्या वेगळ्या टी२० क्रिकेट लीग खेळल्या जाऊ लागल्या, ज्यात रॅम स्लॅम, बांगलादेश प्रीमियर लीग, पाकिस्तान प्रीमियर लीग, बीग बॅश या स्पर्धांचा समावेश आहे. आता देशांतर्गत टी २० स्पर्धेच्या ही पुढे जाऊन भारतात राज्यस्थरीय टी२० लीग चालू झाल्या आहेत.
२०१६ मध्ये चालू झालेल्या तामिळनाडू प्रीमियर लीग नंतर आता या डिसेंबरपासून बंगाल प्रीमियर लीग सुरु होणार आहे. पश्चिम बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सौरव गांगुलीयांनी याचा खुलासा केला. या लीगमध्ये एकूण सहा संघ असतील. या लीगचे सामने ईडन गार्डन्स सह आणखी ३ मैदानांनवर होणार आहेत.
गांगुली म्हणाला “पश्चिम बंगाल क्रिकेटच्या विकासासाठी ही लीग महत्वपूर्ण ठरेल. लीगसाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया ऑगस्टमध्ये पार पडेल”