Friday, March 31, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बंगळुरू प्ले ऑफसाठी प्रयत्नशील, तर ओडिशा तिसऱ्या स्थानावर झेप घेण्यासाठी उत्सुक

बंगळुरू प्ले ऑफसाठी प्रयत्नशील, तर ओडिशा तिसऱ्या स्थानावर झेप घेण्यासाठी उत्सुक

January 14, 2023
in टॉप बातम्या, फुटबॉल
Bengaluru FC

Photo Courtesy: Twitter/Bengaluru FC


बंगळुरू एफसीने इंडियन सुपर लीग २०२२-२३ ( आयएसएल) च्या प्ले ऑफच्या आशा अजूनही सोडलेल्या नाहीत. मागील आठवड्यात विजय मिळवून ३ गुणांची कमाई करणारा बंगळुरू एफसीचा संघ शनिवारी (14 जानेवारी) घरच्या प्रेक्षकांसमोर ओडिशा एफसी विरुद्ध खेळणार आहे. बंगळुरू येथील श्री कांतिरावा स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात बंगळुरू एफसीला विजयाची आशा आहे. सहाव्या क्रमांकावर झेप घेण्यापासून बंगळुरू एफसीचा संघ सहा गुणांनी पिछाडीवर आहे. सध्या एफसी गोवा १९ गुणांसह त्या क्रमांकावर आहे, तर ओडिशा एफसी २२ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. ओडिशाचाही विजय मिळवून तालिकेत आगेकूच करण्याचा मानस आहे.

बंगळुरू एफसीला मागील सामन्यात नॉर्थ ईस्ट युनायटेडने विजयासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले. ९० मिनिटांपर्यंत दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीत होते, परंतु ॲलन कोस्टाने ९० +४ मिनिटाला गोल करून बंगळुरूचा विजय निश्चित केला. यंदाच्या पर्वातील दोन्ही सामन्यांत नॉर्थ ईस्टच्या पराभवाला कोस्टाचा गोलच कारणीभूत ठरला. शिवा नारायणन याने त्या सामन्यात पहिला गोल केला होता. २१ वर्षीय शिवाला यंदाच्या पर्वात काही सामन्यांत सुरुवातीपासून खेळण्याची संधी दिली गेली होती, परंतु मागील ७ सामन्यांत त्याला बाकावर बसवून ठेवले. मात्र, नॉर्थ ईस्ट युनायटेडविरुद्ध त्याने दणक्यात पुनरागमन केले.

We’ve got a spectacle to bring in Sankranthi as the Blues take on Odisha FC at the Fortress this evening. 🌽 Let’s go! 🔵

📺: Star Sports, Hotstar, JioTV
⏰: 5.30 pm IST
🔗: https://t.co/Gp7SaSASMD#BFCOFC #WeAreBFC #NothingLikeIt pic.twitter.com/7YcqyEUnOv

— Bengaluru FC (@bengalurufc) January 14, 2023

शिवा नारायणनला उद्याच्या सामन्यात सुरुवातीपासून खेळवले जाईल अशी अपेक्षा आहे, परंतु मुख्य प्रशिक्षक सायमन ग्रेसन यांना रॉय कृष्णा व सुनील छेत्री यांच्या फॉर्माची चिंता आहे. कृष्णाला मागील सामन्यात गोल करता आला नव्हता, तर छेत्री ८०व्या मिनिटाला गोल करण्याच्या अगदी जवळ आला होता. ”तुम्ही कोणत्याची क्षणी सामना जिंकू शकता, खेळाडू खूपच आनंदी आहेत. परंतु, अजूनही जे साध्य करायचे आहे, ते मिळवलेले नाही. मागील सामन्यात विजय मिळवल्यानंतर आम्ही आता ओडिशाविरुद्धच्या लढतीवर लक्ष केंद्रीत केले आहे. यंदाच्या पर्वात आम्हाला सुरूवातीला न मिळालेला सूर आता गवसला आहे. त्यामुळेच सलग विजय मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे,”असे ग्रेसन म्हणाले.

ओडिशा एफसीची वाटचाल स्वप्नवत सुरू आहे. मागील सामन्यात त्यांनी ईस्ट बंगाल एफसीवर ३-१ असा सहज विजय मिळवला आणि मुख्य प्रशिक्षक जोसेफ गोम्बाऊ हेही बंगळुरू एफसीविरुद्धच्या सामन्यासाठी तयार आहेत. रेनियर फर्नांडेझने मागील सामन्यात गोल करण्याच्या दोन संधी निर्माण केल्या आणि डिएगो मॉरिसिओने त्यावर दोन गोल केले. हिरो आयएसएलच्या यंदाच्या पर्वात मॉरिसिओने १३ सामन्यांत क्लबसाठी सर्वाधिक ७ गोल केले आहेत. विंगर नंदाकुमार सेकर यानेही दोन सामन्यांच्या दुष्काळानंतर गोल केला आणि यंदाच्या पर्वातील हा त्याचा पाचवा गोल ठरला. त्यामुळे गोम्बाऊ त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता कमीच आहे.

”मागचा सामना चांगला झाला. आम्ही त्या निकालाने आनंदी आहोत. आता बंगळुरूमधील नव्या आव्हानाचा सामना करण्याची वेळ आली आहे. या सामन्यात दमदार कामगिरी करून विजय मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे या सामन्यात सकारात्मक विचाराने मैदानावर उतरणार आहोत,”असे गोम्बाऊ म्हणाले. हिरो आयएसएलमध्ये दोन्ही संघ ७ वेळा समोरासमोर आले आहेत. बंगळुरूचे ४ विजयासह पारडे जड आहे,तर ओडिशाला केवळ दोन विजय मिळवता आले आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दु:खद! गुजरातला रणजी खेळायला गेलेल्या क्रिकेटपटूचा मृत्यू, शेवटच्या सामन्यात घेतल्या होत्या 5 विकेट्स
ईस्ट बंगाल एफसीचे आव्हान संपल्यात जमा; पिछाडीवरून जमशेदपूर एफसीचा विजय


Next Post
Sarfaraz-Khan

धावांचा पाऊस पाडून काही उपयोग नाही सरफराज टीम इंडियाच्या बाहेरच! सरासरीत फक्त ब्रॅडमनच्या मागे

Mumbai City FC

अव्वल नंबरी मुंबई सिटी एफसीसमोर बलाढ्य प्रतिस्पर्धी एटीके मोहन बागानचे आव्हान

Photo Courtesy: Twitter/BCCI

'... हा तर रणजी ट्रॉफीचा अपमान', सरफराजला वगळून सूर्याला घेतल्याने भडकले चाहते

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143