---Advertisement---

धावांचा पाऊस पाडून काही उपयोग नाही सरफराज टीम इंडियाच्या बाहेरच! सरासरीत फक्त ब्रॅडमनच्या मागे

On: शनिवार, जानेवारी 14, 2023 10:31 AM
Sarfaraz-Khan
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDvAUS)कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केला. यामध्ये सरफराज खानला संधी मिळाली नाही. या मालिकेत चार सामने खेळले जाणार असून बीसीसीआयने पहिल्या दोन सामन्यांसाठी शुक्रवारी (13 जानेवारी) संघ जाहीर केला. त्याचबरोबर ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांची पहिल्यांदाच कसोटी संघात निवड झाली.

मुंबईकडून स्थानिक क्रिकेट खेळणारा सरफराज खान (Sarfaraz Khan) प्रथम श्रेणीमध्ये उत्तम कामगिरी करत आहे. धावांचा पाऊस पाडत त्याने अनेक मोठ-मोठे विक्रम रचले आहेत. 25 वर्षाच्या या फलंदाजाने 2019-20च्या प्रथम श्रेणीत 155च्या सरासरीने 928 धावा केल्या. 2021-22 हंगामात त्याने 123च्या सरासरीने 900 पेक्षा अधिक धावा केल्या. तर सुरू असलेल्या हंगामात 2022-23मध्ये त्याने 89च्या सरासरीने 801 धावा कुटल्या आहेत. यावरून त्याचा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सरासरी 80 पेक्षा अधिकच आहे. यामध्ये त्याच्यापुढे केवळ सर डॉन ब्रॅडमन आहेत.

सरफराजला आतातरी कसोटी संघात जागा मिळेल, अशी अपेक्षा असताना पुन्हा एकदा त्याला वगळले गेले. यावर भारताचे माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी त्याची संघात निवड व्हायला हवी होती, असे मत व्यक्त केले.

प्रथम श्रेणीमध्ये ब्रॅडमन यांची सरासरी 95.14 आहे. त्यानंतर सरफराजचा क्रमांक लागतो. त्याने 36 सामन्यातील 52 डावांमध्ये 80.47च्या सरासरीने आतापर्यंत 3380 धावा केल्या आहेत. यामध्ये 12 शतके आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने एकावेळी नाबाद 301 धावाही केल्या आहेत.

बीसीसीआयने सध्या दोनच कसोटी सामन्यांसाठी संघ घोषित केला आहे. यामध्ये रवींद्र जडेजा याचीही निवड झाली आहे. तसेच बाकी दोन कसोटी सामन्यांमध्ये तरी सरफराजला संधी मिळेल अशी अपेक्षा आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकत व सूर्यकुमार यादव. (IndvsAus Test series Sarfaraz Khan Once again missed out in the Indian team)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बंगळुरू प्ले ऑफसाठी प्रयत्नशील, तर ओडिशा तिसऱ्या स्थानावर झेप घेण्यासाठी उत्सुक
दु:खद! गुजरातला रणजी खेळायला गेलेल्या क्रिकेटपटूचा मृत्यू, शेवटच्या सामन्यात घेतल्या होत्या 5 विकेट्स

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---