प्रो कबड्डी लीग २०२१ चा हंगाम दिवसेंदिवस रोमांचक बनत चालला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच दिवशी (१ फेब्रुवारी) प्रो कबड्डीचा ८७ वा सामना बेंगलुरू बुल्स आणि यूपी योद्धा संघात झाला. बेंगलुरू बुल्सने ३१-२६ च्या अंतराने हा सामना जिंकला. हा बेंगलुरू बुल्सचा हंगामातील आठवा विजय होता.
MATCH SET. SCORE SETTLED. 💯
The Bulls are back on track with a terrific victory over their arch-rivals 💥#SuperhitPanga #VIVOProKabaddi #BLRvUP pic.twitter.com/RX0ieeYts1
— ProKabaddi (@ProKabaddi) February 1, 2022
तत्पूर्वी ८६ वा सामना गुजरात जायंट्स विरुद्ध बेंगाल वॉरियर्स यांच्यात रंगला. गुजरात जायंट्सने ३४-२५ च्या फरकाने हा सामना जिंकला आहे.
या सामन्यात पहिल्या हाफपर्यंत दोन्हीही संघ बरोबरीचे प्रदर्शन करत होते. पहिल्या हाफमध्ये गुजरात जायंट्सने फक्त एका गुणाने आघाडी घेतली होती. परंतु पुढे गुजरात जायंट्सच्या कबड्डीपटूंनी बेंगाल वॉरियर्सला बॅकफूटवर सोडले. गुजरात जायंट्सचा संघ सामना संपायला अवघे काही मिनिट बाकी असताना बेंगाल वॉरियर्सपासून १० गुणांची पुढे होता. परिणामी बेंगाल वॉरियर्सला गुणांचे हे अंतर पार करता आले नाही आणि त्यांनी ९ गुणांच्या फरकाने हा सामना गमावला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘गुजरात जायंट्स’ने ‘बेंगाल वॉरियर्स’ला दाखवले आस्मान, ९ गुणांनी सामना घातला खिशात
पहिल्याच हंगामात आरसीबीने पैशांचा पाऊस पाडल्याने विराट झालेला चकित, २००८च्या आठवणीत झाला भावुक
विराटने गिफ्ट केला होता फ्लॅट, तर धोनीने बोलावले होते मुंबईला, कोण आहे ही पूजा बिश्नोई? घ्या जाणून