पहिल्यांदाच इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा हंगाम खेळत असलेला गुजरात टायटन्स संघाने जबरदस्त कामगिरी केली. त्यांनी सर्वप्रथम प्लेऑफचे तिकीट मिळवले. त्यानंतर त्यांनी पहिल्या क्वालिफायर सामन्यात विजय मिळवत अंतिम सामन्याचेही तिकीट मिळवले. पुढे रविवारी (दि. २९ मे) राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध त्यांनी आयपीएल २०२२चा अंतिम सामना खेळला. या हंगामात गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या याने चमकदार कामगिरी केली.
या सामन्यात नाणेफेक जिंकत राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघ पहिल्यांदा फलंदाजीला उतरला होता. यावेळी राजस्थानच्या फलंदाजांच्या गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या याने दांड्या गुल केल्या. यासोबतच त्याने खास विक्रमही आपल्या नावावर केला. पंड्याने या राजस्थानविरुद्ध गोलंदाजी करताना ४ षटके टाकली. या ४ षटकात त्याने १७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. त्याने विकेट्स घेतलेल्या फलंदाजांमध्ये जोस बटलर, संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायर यांच्या नावांचा समावेश आहे.
Caught & bowled! 👏 👏
Wicket No. 3⃣ for the @gujarat_titans captain @hardikpandya7! 👌 👌
What an outstanding #TATAIPL 2022 Final he is having! 👍 👍 #GTvRR#RR lose their fifth wicket as Shimron Hetmyer gets out.
Follow The Final ▶️ https://t.co/8QjB0b5UX7 pic.twitter.com/BI1jXHLXCd
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2022
बनला आयपीएलच्या अंतिम सामन्यात विकेट्स घेणारा दुसरा कर्णधार
या कामगिरीसह हार्दिक पंड्या आयपीएल हंगामातील अंतिम सामन्यात विकेट्स घेणारा दुसरा कर्णधार बनला. त्याच्यापूर्वी अनिल कुंबळे यानेही अशीच चमकदार कामगिरी केली होती. कुंबळेने आयपीएल २००९मध्ये अंतिम सामन्यात गोलंदाजी करताना ४ षटके फेकली होती. या ४ षटकात त्याने १६ धावा देत तब्बल ४ विकेट्स घेतल्या होत्या.
कुंबळे आणि पंड्याव्यतिरिक्त आयपीएलच्या अंतिम सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांमध्ये ड्वेन ब्रावो, करणवीर सिंग आणि रविचंद्रन अश्विन यांचा समावेश आहे. ब्रावो याने आयपीएल २०१३मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध अंतिम सामन्यात गोलंदाजी करताना ४२ धावा देत ४ विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्याव्यतिरिक्त करणवीर सिंग याने आयपीएल २०१४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ५४ धावा देत ४ विकेट्स घेतल्या होत्या, तर अश्विन याने आयपीएल २०११मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध अंतिम सामन्यात १६ धावा देत ३ विकेट्स घेतल्या होत्या.
आयपीएल अंतिम सामन्यात गोलंदाजांची सर्वोत्तम कामगिरी
४/१६- अनिल कुंबळे (विरुद्ध, डेक्कन चार्जर्स २००९)
४/४२- ड्वेन ब्रावो (विरुद्ध, मुंबई इंडियन्स २०१३)
४/५४- करणवीर सिंग (विरुद्ध, कोलकाता नाईट रायडर्स, २०१४)
३/१६- रविचंद्रन अश्विन (विरुद्ध, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, २०११)
३/१७- हार्दिक पंड्या (विरुद्ध, राजस्थान रॉयल्स, २०२२)
हार्दिक पंड्याचे विकेट्सचे अर्धशतक
हार्दिक पंड्या याने या विकेट्ससोबतच आपले आयपीएल कारकीर्दीतील ५० विकेट्सचा टप्पाही पूर्ण केला. त्याने आतापर्यंत १०७ सामन्यात ७० डावांमध्ये गोलंदाजी करताना ८.७७च्या इकॉनॉमी रेटने ५० विकेट्स घेतल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कानामागून आला आणि तिखट झाला; एकच चेंडू फेकला आणि उमरान मलिकचं बक्षीस घेऊन गेला