इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये सुरुवातीपासूनच मुंबई इंडियन्स संघ संघर्ष करताना दिसत आहे. मुंबईने खेळलेल्या १० सामन्यांतील २ सामने सोडले, तर उर्वरित ८ सामन्यात त्यांना पराभवाचाच धक्का बसला आहे. असे असले, तरीही मुंबईचे काही खेळाडू आपली छाप सोडताना दिसत आहेत. यामध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचाही समावेश आहे. पहिल्या १० सामन्यात शांत असलेला बुमराह सोमवारी (दि. ०९ मे) कोलकाताविरुद्धच्या सामन्यात चांगलाच फॉर्ममध्ये दिसला. त्याने कारकीर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी केली असे म्हणले, तरीही वावगं ठरणार नाही.
या सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाने फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ९ विकेट्स गमावत १६५ धावा चोपल्या. यावेळी मुंबईकडून गोलंदाजी करताना बुमराहने अफलातून गोलंदाजी केली. आतापर्यंत खेळलेल्या या हंगामातील १० सामन्यात जे जमले नाही, ते त्याने कोलकाताविरुद्धच्या सामन्यात करून दाखवले.
मज़ा आया, पलटन? 🔥#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #MIvKKR pic.twitter.com/AG3yubXoOH
— Mumbai Indians (@mipaltan) May 9, 2022
बुमराहने या सामन्यात ४ षटके गोलंदाजी केली. या ४ षटकात त्याने १ षटक निर्धाव टाकत फक्त १० धावा दिल्या आणि कोलकाताच्या ५ फलंदाजांची विकेट घेतली. बुमराहची ही आतापर्यंतची आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी होती. या कामगिरीमुळे बुमराह आयपीएलमध्ये सर्वोत्तम वेगवान गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे.
बुमराहने या यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. या यादीत अव्वलस्थानी अल्झारी जोसेफ आहे. त्याने २०१९मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळताना १२ धावा देत ६ विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. दुसऱ्या क्रमांकावर सोहेल तन्वीर आहे. त्याने २००८मध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध गोलंदाजी करताना १४ धावा देत ६ विकेट्स घेतल्या होत्या. या यादीत चौथ्या स्थानी इशांत शर्मा आहे. त्याने २०११मध्ये कोची टस्कर्स केरलाकडून खेळताना १२ धावा देत ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. या यादीत पाचव्या स्थानी लसिथ मलिंगा आहे. त्याने २०११मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १३ धावा देत ५ विकेट्स घेतल्या होत्या.
जसप्रीत बुमराहची आयपीएल २०२२मधील कामगिरी
जसप्रीत बुमराहने आयपीएल २०२२मध्ये आतापर्यंत ११ सामने खेळले आहेत. कोलकाताविरुद्धच्या सामन्यापूर्वी बुमराहच्या नावावर १० सामन्यात ५ विकेट्स होत्या. मात्र, कोलकाताविरुद्धच्या सामन्यानंतर त्याच्या नावावर ११ सामन्यात ७.४१च्या इकॉनॉमी रेटने १० विकेट्स झाल्या आहेत.
आयपीएलमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करणारे वेगवान गोलंदाज
६/१२- अल्झारी जोसेफ (विरुद्ध हैदराबाद, २०१९)
६/१४- सोहेल तन्वीर (विरुद्ध चेन्नई, २००८)
५/१०- जसप्रीत बुमराह (विरुद्ध कोलकाता, २०२२)*
५/१२- इशांत शर्मा (विरुद्ध कोची, २०११)
५/१३- लसिथ मलिंगा (विरुद्ध दिल्ली, २०११)
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘…म्हणून वेंकटेश अय्यरला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले होते’, प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमने सांगितले कारण