बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. उभय संघांतील कसोटी मालिकेचा हा दुसरा सामना असून मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जात आहे. पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियासाठी वरच्या फळीत फलंदजी करणारा मार्नस लाबुशेन याने सामन्याच्या पहिल्या दिवशी असे श्रेत्ररक्षण केले, जे पाहून प्रत्येकजण हैराण राहिला. त्याने एक जबरदस्त डाईव्ह मारत खाया जोंडो याचा झेल पकडला.
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज मिचेच स्टार्क (Mitchell Starc) 29 व्या षटकात गोलंदाजी करत होता. षटकातील तिसऱ्या चेंडूवर खाया जोंडो (Khaya Zondo) याने कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू हवेत जास्त उडाला आणि परिणामी मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) याने संधी साधत झेल घेतला. लाबुशेनचा हा झेल पाहून चाहत्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. हा झेल एवढा उत्कृष्ट होता की, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने देखील याची दखल घेतली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. अनेकांच्या मते बॉक्सिंग डे कसोटी (Australia v South Africa boxing day Test) सामन्यांच्या इतिहासातील हा सर्वोत्तम झेल आहे. चाहते या व्हिडिओखाली व्यक्त होत आहेत.
Leaping Labuschagne! Sensational #AUSvSA pic.twitter.com/7gVzTWC6s7
— cricket.com.au (@cricketcomau) December 26, 2022
उभय संघांतील या कसोटी सामन्याविषयी बोलायचे झाले, तर दक्षिण आफ्रिका संघाचा पहिला डाव अवघ्या 189 धावांवर गुंडाळला गेला. दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने देखील एका विकेटच्या नुकसानावर 45 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमरून ग्रीनने पहिला दिवस नावावर केला. ग्रीनने पहिल्या डावात टाकलेल्या 10.4 षटकांमध्ये 27 धावा खर्च केल्या आणि सर्वाधिक 5 विकेट्स नावावर केल्या. तसेच मिचेल मार्शने देखील 39 धावा खर्च करून दोन विकेट्स नावावर केल्या. दक्षिण आफ्रिकेचासटी काइल वेरेन आणि मार्को जॅन्सन यांनी प्रत्येकी अर्धशतकीय योगदान दिले. (Best Catch in Boxing Day Test History! Marnus Labuschevner showered with praise from fans)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लाईव्ह कार्यक्रमात गेलचा अनिल कुंबळेंवर आयपीएल कारकीर्द संपवल्याचा आरोप; म्हणाला…
श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून रोहित-राहुलचा पत्ता कट? कारणही घ्या जाणून