ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऍडलेड येथे झालेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला शनिवारी (१९ डिसेंबर) मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले. दिवस-रात्र झालेल्या या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्या दोन दिवशी चांगला खेळ केला होता. भारताने पहिल्या डावात ५३ धावांची आघाडीही घेतली होती. मात्र भारताचा दुसरा डाव केवळ ३६ धावांतच संपुष्टात आला. त्यामुळे अवघ्या ९० धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने सहज पार केले. यानंतर भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या.
भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफनेही त्याचे मत व्यक्त केले. मात्र त्याला भारताचाच दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने ट्रोल केले आहे.
कैफने पहिल्या कसोटीनंतर ट्विट केले की ‘३६/९ अशी अवस्था ऍडलेडमध्ये सकाळ असताना झाली, सर्वांना भीती असलेल्या संध्याकाळी नाही. चेंडू लाल असो किंवा गुलाबी, कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजीत अचूक तंत्र आणि मानसिकता असणे महत्त्वाचे असते. मर्यादीत षटकांचे सामने किंवा नेटमध्ये घालवलेला मर्यादीत वेळ तुम्हाला कसोटीसाठी तयार करु शकत नाही.’
36/9 came on a bright sunny Adelaide morning and not at twilight as many feared. Pink or red ball, Test match batting is all about correct technique and temperament. Limited over games or limited time at nets can't prepare you for a Test.
— Mohammad Kaif (@MohammadKaif) December 20, 2020
कैफच्या या ट्विटवर हरभजन सिंगने मजेदार कमेंट केली आहे. त्याने कमेंट करताना लिहिले आहे की ‘भाई साहब इतनी अंग्रेजी’.
Bhai Sahb itni angreji 😋😋😝 https://t.co/cihQTS7nkd
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) December 20, 2020
कैफ आणि हरभजन हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. काहीवर्षे ते भारतीय संघाकडून एकत्र खेळले देखील आहेत. तसेच दोघेही सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. त्याचबरोबर ट्विटर अकाउंटवरुन अनेक विषयांवर ते त्यांची मते व्यक्तही करत असतात.
सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत पहिला सामना जिंकल्याने ऑस्ट्रेलियाने १-० अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा सामना मेलबर्न येथे २६ डिसेंबरपासून सुरु होईल. या सामन्यात विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे भारतीय संघाच्या नेतृत्वाची धूरा सांभाळणार आहे. भारताचा नियमित कर्णधार कोहली पालकत्व रजा घेतल्याने लवकरच भारतात परतेल.
महत्त्वाच्या बातम्या –
‘रवी शास्त्रींपासून दूर राहा’, पाहा जड्डूला कुणी दिलाय ‘हा’ सल्ला
गावसकरांची रिकी पाँटिंगला वाढदिवसाची खास भेट, पाहा फोटो